CoronaVirus News: राज्यात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्ण; २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 06:56 IST2020-09-09T02:03:45+5:302020-09-09T06:56:19+5:30
आलेख चढाच

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्ण; २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू
मुंबई : राज्यात मंगळवारी कोरोनाचे २० हजार १३१ रुग्ण आढळले असून ३८० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आलेख चढाच आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ४३ हजार ७७२ झाली असून मृतांचा आकडा २७,४०७ झाला.
राज्यात सध्या २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ असून मृत्युदर २.९ टक्के आहे. दिवसभरात १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
दिवसभरातील ३८० मृत्यूंमध्ये मुंबई ४२, ठाणे ९, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा १, कल्याण-डोंबिवली मनपा ५, भिवंडी-निजामपूर मनपा ३, मीरा- भार्इंदर मनपा ३, पालघर ३, रायगड २, पनवेल मनपा १, नाशिक ७, नाशिक मनपा १२, मालेगाव मनपा ४, अहमदनगर ६, अहमदनगर मनपा ३, धुळे मनपा १, जळगाव ११, जळगाव मनपा ५, नंदुरबार १, पुणे २०, पुणे मनपा ३५, पिंपरी-चिंचवड मनपा १३, सोलापूर ११, सोलापूर मनपा १, सातारा १६, कोल्हापूर २०, कोल्हापूर मनपा ५, सांगली १७, सांगली-मिरज कुपवाड मनपा ११, सिंधुदुर्ग १, रत्नागिरी ३, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ४, जालना १, हिंगोली १, परभणी १, लातूर ४, लातूर मनपा १, उस्मानाबाद १, बीड ७, नांदेड ६, नांदेड मनपा ३, अमरावती ५, अमरावती मनपा २, यवतमाळ १, बुलडाणा १, वाशिम १, नागपूर ३, नागपूर ५३ आणि अन्य राज्य/ देशातील दोन रुग्णांचा समावेश आहे.