CoronaVirus News: मुंबईत १७ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 04:46 IST2020-08-20T04:45:49+5:302020-08-20T04:46:18+5:30
तर दिवसभरात ८६४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून १ लाख ६० हजार ५७ रुग्ण कोविडमुक्त झाले.

CoronaVirus News: मुंबईत १७ हजार कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
मुंबई : मुंबईत दिवसभरात १,१३२ नवे कोरोना रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३१ हजार ५४२ वर पोहोचली आहे. ४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ७ हजार २६५ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ८६४ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून १ लाख ६० हजार ५७ रुग्ण कोविडमुक्त झाले.
मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा काळ ८९ दिवसांवर गेला आहे. शहरात १७,९१७ सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाने दिली. दरम्यान, शहर उपनगरात दिवसभरात नोंद झालेल्या ४६ मृत्यूंमध्ये ३९ रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये २८ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील एकाचे वय ४० वर्षांखाली आहे. ३२ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते.
सध्या शहर, उपनगरात झोपडपट्टया व चाळींमध्ये ५७५ सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर ५ हजार ४९३ सक्रिय सीलबंद इमारती आहेत.