CoronaVirus : The municipality erected a 50-bed detached room in Borivali vrd | CoronaVirus : पालिकेने उभारला बोरीवलीत 50  खाटांचा सुसज्ज अलगीकरण कक्ष

CoronaVirus : पालिकेने उभारला बोरीवलीत 50  खाटांचा सुसज्ज अलगीकरण कक्ष

मनोहर कुंभेजकर
मुंबई- कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबीयांनी कोरोनाचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये म्हणून घरातच 14 दिवस अलगीकरण झाले पाहिजे. मात्र झोपडपट्यांमध्ये कॉमन शौचालय व पाण्याची जोडणी असल्याने अलगीकरण होणे कोरोना बाधीत रुग्णांच्या कुटुंबीयांना शक्य होत नाही. आर मध्य वॉर्ड मध्ये सध्या कोरोनचे 8 रुग्ण आहेत.मात्र जर अलगीकरणाची गरज लागल्यास खबरदारी म्हणून परिमंडळ 7 चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पश्चिम, पंजाबी लेन येथे सहाय्यक आयुक्त डॉ.भाग्यश्री कापसे यांनी  ५० खाटांच्या सुसज्ज अलगीकरण केंद्राची निर्मिती केली आहे.

पंजाबी लेन येथील मनपा चिकित्सा केंद्र इमारतीत पहिल्या मजल्यावर सदर कक्ष तयार करण्यात आला आहे. येथे राहाण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून सध्या तरी येथे अलगीकरण रुग्ण नसल्याची माहिती डॉ.कापसे यांनी दिली.
 
पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी
अलिकडेच या ठिकाणी भेट दिली असता, येथे लवकर सुसज्ज अलगीकरण सुरू करा असे निर्देश दिले होते.त्यानुसार येथे सुसज्ज कक्ष डॉ.कापसे यांच्या सूचनेनुसार तयार करण्यात आला अशी माहिती आर मध्य विभागाचे परिरक्षण प्रमुख  राजेश अक्रे यांनी लोकमतला दिली.

दरम्यान आर मध्य वॉर्डमध्ये आजमितीस कोरोनाचे 8 रुग्ण असून,कोरोना बाधित रुग्णांची इमारत पोलिसांच्या मदतीने पालिकेने सील केली आहे.येथील परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून निर्जंतुक फवारणी करण्यात आली आहे.तसेच येथील नागरिकांची कोरोना टेस्ट देखिल करण्यात येत आहे.
पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार व डॉ.भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा अभियंता, अधिकारी अहोरात्र कार्यरत आहेत तीन पाळ्यांमधे
 काम करत असून त्यांच्या मदतीला कामगार व संबंधित पोलीस स्टेशनचा स्टाफ देखील तैनात  आहे.

Web Title: CoronaVirus : The municipality erected a 50-bed detached room in Borivali vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.