Coronavirus: गाडीवर रुग्णवाहिकेचा सायरन लावला, कोरोना कोरोना म्हणत फिरला; अखेर पोलिसांनी धरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 00:52 IST2020-03-29T00:50:27+5:302020-03-29T00:52:17+5:30
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात

Coronavirus: गाडीवर रुग्णवाहिकेचा सायरन लावला, कोरोना कोरोना म्हणत फिरला; अखेर पोलिसांनी धरला
मुंबई: कारमध्ये सायरन लावून पोलिसांची खिल्ली उडवत रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. पोलिसांना याबाबत समजताच त्यांनी संबंधित चालकाला अटक केली. सध्या त्याची चौकशी सुरू आहे.
रुग्णवाहिकेचा सायरन लावून कार चालवणारा एक जण अटकेत; पोलिसांकडून चौकशी सुरू pic.twitter.com/SgQ2WMIEAa
— Lokmat (@MiLOKMAT) March 28, 2020
मुंबईसह देशभरात कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती असताना, माटुंगा किंग सर्कल येथील एका माथेफिरूचा व्हिडीओ व्हायरल झाला. अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांना पोलीस अडवत नाहीत, याचाच फायदा उठवत हा कार चालक रुग्णवाहिकेचा सायरन लावून कोरोनो कोरोनो म्हणत रस्त्यावर मोकाट फिरत होता. फेसबुकवर हा व्हिडीओ व्हायरल होताच, माटुंगा पोलिसांनी कारवाई करत या कार चालकाला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा देत, याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे सांगितले. ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती एका नामांकित रेस्टरंटचा मालक असल्याचे समजते.