CoronaVirus in Mumbai : मुंबईत दिवसभरात ९ हजार ३२७ रुग्ण,५० मृत्यू; पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 05:18 AM2021-04-11T05:18:33+5:302021-04-11T07:07:47+5:30

CoronaVirus in Mumbai : मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्क्यांवर आला असून ३ ते ९ एप्रिलपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर १.९७ टक्के असल्याची नोंद आहे.

CoronaVirus in Mumbai: 9,327 patients, 50 deaths in Mumbai in a day; Information of the health department of the municipality | CoronaVirus in Mumbai : मुंबईत दिवसभरात ९ हजार ३२७ रुग्ण,५० मृत्यू; पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती 

CoronaVirus in Mumbai : मुंबईत दिवसभरात ९ हजार ३२७ रुग्ण,५० मृत्यू; पालिकेच्या आरोग्य विभागाची माहिती 

googlenewsNext

मुंबई :  मुंबईत शनिवारी ९ हजार ३२७ रुग्ण आणि ५० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आता शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख १० हजार २२५ झाली असून बळींचा आकडा ११ हजार ९५९ झाला आहे. सध्या शहर, उपनगरात ९१ हजार १०८ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७९ टक्क्यांवर आला असून ३ ते ९ एप्रिलपर्यंत एकूण कोविड वाढीचा दर १.९७ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३४ दिवसांवर आला आहे. दिवसभरात ४८ हजार ७४९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून एकूण ४५ लाख ५८ हजार ६३० चाचण्या करण्यात आल्या आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात ३४ पुरुष, तर १६ रुग्ण महिला होत्या. २ रुग्णांचे वय ४० च्या वर होते, तर ३९ रुग्णांचे वय ६० हून अधिक होते. उर्वरित ९ रुग्ण हे ४० ते ६० वयोगटातील होते. शहर, उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय कंटेनमेंट झोन्सची संख्या ७९ आहे, तर सक्रिय सीलबंद इमारती ७९९ आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील ३८ हजार ११ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

Web Title: CoronaVirus in Mumbai: 9,327 patients, 50 deaths in Mumbai in a day; Information of the health department of the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.