Join us

Coronavirus : मनसेनेही घेतला कोरोनाचा धसका, गुढीपाडवा मेळावा केला रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 17:25 IST

Coronavirus : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोरोना या महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

ठळक मुद्देमहाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे.काही दिवसांपासून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु असताना मनसेने यंदा गुढीपाडवा मेळावा रद्द करत असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 

मुंबई - देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोनाने हैदोस घातला असून कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा फैलाव संपूर्ण देशात हळूहळू वाढत चालला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोरोना या महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. 

महाराष्ट्रात करोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. सरकारकडून काल मध्यरात्रीपासून काही संस्था बंद करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये जीम, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, जलतरणतलाव यांचा समावेश आहे. मात्र, हा नियम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर या शहरांनाच लागू करण्यात आला आहे. तसेच, पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील शाळा बंद करण्यात येत आल्या आहेत. त्यातच करोना या महामारीविरोधात लढण्यासाठी सरकारने खबरदारी उपाय सरकरने वरील संस्था बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरु असताना मनसेने यंदा गुढीपाडवा मेळावा रद्द करत असल्याचे पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. 

 

 

टॅग्स :मनसेकोरोनामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस