coronavirus: MLAs get 50 lakh special funding for coronas prevention | coronavirus : कोरोना प्रतिबंधासाठी आमदारांना मिळणार 50 लाखांचा विशेष निधी

coronavirus : कोरोना प्रतिबंधासाठी आमदारांना मिळणार 50 लाखांचा विशेष निधी

मुंबई :  आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा स्तरावर कोरोनोच्या परिणामकारक प्रतिबंधात्मक  कार्यवाहीसाठी आमदारांना विशेष बाब म्हणून 50 लाखांच्या मर्यादेपर्यंतचा निधी उपलब्ध करून देण्यास शुक्रवारी शासनाने मान्यता दिली. 

या निधीतून आमदारांना वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करता येईल. इनफ्रारेड थर्मामीटर,  पर्नसन प्रोटेक्शन इक्विपमेंटस् किटस्, कोरोना टेस्टिंग किटस्, आयूसी व्हेटिंलेटर व आयसोलेशन वार्ड किंवा क्वारंटाईन व्यवस्था, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर व इतर साहित्याची खरेदी या निधीतून करता येईल.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमातून वैद्यकीय यंत्रसामुग्रीसाठी आमदारांनी निधीच शिफारस केल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता द्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे. विहित अटींनुसार संबंधित यंत्रसामुग्री खरेदी करता येईल. यंत्रसामुग्रीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी संबंधित निधी खर्च करता येणार नाही.

Web Title: coronavirus: MLAs get 50 lakh special funding for coronas prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.