Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३६ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 11:32 PM2021-10-11T23:32:28+5:302021-10-11T23:35:01+5:30

दिवसभरात ३,०३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे. 

Coronavirus In Maharashtra: 1,736 new coronavirus patients registered in the last 24 hours in the maharashtra; 36 death | Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३६ जणांचा मृत्यू

Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ७३६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ३६ जणांचा मृत्यू

Next

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ७३६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात ३,०३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३२ टक्के आहे. 

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी ०३ लाख ०३ हजार ७४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ७९ हजार ६०८ (१०.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ३८ हजार ४७४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, १ हजार १६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त ८४६५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (११), नंदूरबार (५),  धुळे (७), जालना (६५), परभणी (९०), हिंगोली (१९), नांदेड (१२), अकोला (०४), वाशिम (०३), बुलढाणा (०६), नागपूर (७१), यवतमाळ (०४),  वर्धा (०४), भंडारा (२), गोंदिया (३), गडचिरोली (१४) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १००च्या खाली आहे.

Web Title: Coronavirus In Maharashtra: 1,736 new coronavirus patients registered in the last 24 hours in the maharashtra; 36 death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app