Join us  

Coronavirus: महाराष्ट्रात १४ एप्रिलनंतरही लॉकडाऊन कायम राहणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:17 PM

या व्हिडीओ कॉन्फरन्स पंतप्रधानांसह सर्व मुख्यमंत्री तोंडावर मास्क लावलेले होते.

ठळक मुद्देराज्यात लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणालोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये

मुंबई – राज्यातल्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे हे सत्य आहे. पंतप्रधानांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मला बोलण्याची संधी मिळाली तेव्हा मी १४ तारखेनंतरही लॉकडाऊन ठेवणार असल्याचं त्यांना सांगितले. राज्यात किमान ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषित केले आहे.  

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, शेतीच्या कामावर कोणतंही लॉकडाऊन आणलं नाही, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहील. १४ एप्रिलनंतर कुठेही मला गोंधळ नको, या संकटाचा सामना महाराष्ट्र ध्येर्याने करत आहे. या संकटात देशाला आणि जगाला दिशा देण्याचं काम महाराष्ट्राला करायचं आहे. हा लॉकडाऊन कधीपर्यंत काळेल हे जनतेच्या हातात आहे. आपणचं कोरोना संक्रमित साखळदंड तोडला तर लॉकडाऊन लवकरच संपेल. ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहील असं ते म्हणाले.

तसेच या व्हिडीओ कॉन्फरन्स पंतप्रधानांसह सर्व मुख्यमंत्री तोंडावर मास्क लावलेले होते. आजपर्यंत कोणीही आमचं तोंड बंद करण्याची हिंमत केली नाही पण एका विषाणूने आज हे चित्र पाहायला मिळालं. आम्ही सुद्धा जबाबदारी घेत आहोत. या वातावरणात राजकारण करु नका, प्रत्येकाने एकजूट कायम ठेवली तर आपला देश कोरोनाच्या संकटावर मात करेल पण भारत हा जगातील महासत्ता देश बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

त्याचसोबत आता समोरून रुग्ण येण्याची वाट न पाहता महापालिका घरोघरी जाऊन लोकांच्या चाचणी करत आहे. मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्यात आहेत यातील १ हजार कोविड रुग्ण आढळले आहे. मात्र या लोकांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली आहेत हे दिलासादायक आहे. क्वारंटाईनमध्ये असणाऱ्यांची तपासणी करुन त्यांची टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनाही घरी सोडलं जात आहे. ६० पेक्षा अधिक वय असणाऱ्या अथवा याआधीच आजारग्रस्त आहेत त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, घराबाहेर पडू नका, अत्यावश्यक असेल तर घराबाहेर मास्क लावून पडा. घरातील ज्येष्ठ, मुलांना जपा, त्यांच्यापर्यंत हा व्हायरस पोहचू देऊ नका, ही परिस्थिती नियंत्रणात आहे असं वाटत असलं तरी गाफील राहता कामा नये. या सोमवारी आपल्या राज्यात पहिला रुग्ण आढळून ५ आठवडे होतील. एकही कोरोनाग्रस्त आढळणार नाही याची मला खबरदारी घ्यायची आहे. कोरोना संक्रमित साखळी तोडायला वेळ लागेल. मग काय करायचं, कसं करायचं हा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. काही ठिकाणी निर्बंध कठोर करायलाच लागतील. लोकांनी गर्दी करु नये असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.  

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसउद्धव ठाकरेमहाराष्ट्र