CoronaVirus : जनतेनं ऐकलं नाही, तर प्लॉन बी तयार; डॉ. तात्याराव लहानेंनी सांगितला 'उपाय'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 01:49 PM2020-03-26T13:49:36+5:302020-03-26T14:11:35+5:30

हा अदृश्य शत्रू आहे, जो दिसत नाही, त्यामुळे तो कुठून, कसा हल्ला करेल हे लक्षात येत नसल्यामुळे घरात राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरच हा आजार पुढे किती प्रगती करेल हे अवलंबून आहे.

CoronaVirus : If the public does not listen, Plan B prepares; Tatyarao Pundlikrao Lahane proposes 'solution' vrd | CoronaVirus : जनतेनं ऐकलं नाही, तर प्लॉन बी तयार; डॉ. तात्याराव लहानेंनी सांगितला 'उपाय'

CoronaVirus : जनतेनं ऐकलं नाही, तर प्लॉन बी तयार; डॉ. तात्याराव लहानेंनी सांगितला 'उपाय'

Next
ठळक मुद्देकोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, अजूनही आजार दुसऱ्या टप्प्यात आहे. सगळ्याच नागरिकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं ऐकलं आणि घरामध्ये राहिले तर हा आजार तिसऱ्या टप्प्यात जाणार नसल्याचंही डॉ. तात्याराव लहानेंनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईः कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारनंही सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक अतुल कुलकर्णी यांनी वैद्यकीय शिक्षण मंडळाचे संचालक असलेल्या डॉ. तात्याराव लहानेंशी बातचीत केली आहे.  राज्यातील परिस्थिती नियंत्रणात असून, अजूनही आजार दुसऱ्या टप्प्यात आहे. सगळ्याच नागरिकांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं ऐकलं आणि घरामध्ये राहिले तर हा आजार तिसऱ्या टप्प्यात जाणार नसल्याचंही डॉ. तात्याराव लहानेंनी स्पष्ट केलं आहे. पण लोक घरात राहिले नाहीत, तर तो तिसऱ्या टप्प्यातही जाऊ शकतो. हा अदृश्य शत्रू आहे, जो दिसत नाही, त्यामुळे तो कुठून, कसा हल्ला करेल हे लक्षात येत नसल्यामुळे घरात राहणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावरच हा आजार पुढे किती प्रगती करेल हे अवलंबून आहे.

लोकांनी काळजी घेतल्यास कमी प्रमाणात त्याची लागण होईल. मुंबई पालिकेची बहुतेक सर्वच रुग्णालये आयसोलेशनसाठी वापरली जाणार आहेत. मुंबईत ३१५ आयसोलेशनच्या खाटा तयार असून, ७० खाटांमध्ये जिथे सीसीयू म्हणजे व्हेटिंलेटर्स, मॉनिटर्स लागतात, अशा खाटांची सोय आपण करत आहोत. बालरुग्णांना कामा रुग्णालयात पाठवण्यात येत आहे, तर बाकीचे रुग्ण जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत. प्रत्येक खाटेमध्ये ३ फुटांचं अंतर ठेवून सहा वॉर्ड तयार केले आहेत. 

१८ वर्षांच्या खालील कोरोनाबाधित मुलांसाठी एक स्वतंत्र कक्षसुद्धा केला आहे. १८ वर्षांपर्यंतची मुलं या विशेष कक्षात ठेवण्यात येणार आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयात तशी व्यवस्था करण्यात आली असून, दोन दिवसांत ते पूर्णतः कार्यरत होणार आहे. महाराष्ट्रातलं कस्तुरबा, नायडू रुग्णालयं ही कोरोना समर्पित रुग्णालय असून,  सेंट जॉर्ज रुग्णालयातही स्वतंत्रपणे विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. गरज पडल्यास जी. टी. रुग्णालयही रिकामी करून २५० खाटांचं नियोजन करणार असून, तिथेसुद्धा कोरोनाग्रस्त रुग्णांना ठेवता येऊ शकते. २९ तारखेपर्यंत ही सर्व रुग्णालयं कार्यरत होतील.

पुण्यात ११ मजल्यांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण झालं आहे. तिथे ६०० खाटा आयसोलेशनच्या आणि १०० खाटा क्रिटिकल केअर युनिटच्या सुरू करत आहोत. नागपूरमध्ये आपण ३०० खाटा आयसोलेशनच्या आणि ६० खाटा क्रिटिकल केअर युनिटच्या रुग्णांसाठी ठेवण्यात आल्या आहोत. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या मदतीनं हे काम सुरू आहे.  तात्याराव लहानेंना महाराष्ट्रातील लॅबसंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, २१ लॅब महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सुरू करत आहोत. सध्या १२ लॅब सुरू झाल्या आहेत. बाकीच्या लॅबही लवकरच सुरू होणार आहेत. मुंबई, पुण्यात या लॅब आहेत, बाहेरच्या ठिकाणी या लॅब नाहीत. त्यासाठी आपण बी प्लॅन तयार केला आहे. लोकांनी ऐकलं आणि ते घराबाहेर न पडल्यास या लॅबची आणि बेड्सची आपल्याला गरज पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 
 

Web Title: CoronaVirus : If the public does not listen, Plan B prepares; Tatyarao Pundlikrao Lahane proposes 'solution' vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.