coronavirus: Hotels, lodges will get 33% space, municipal condition, ban in restricted areas maintained | coronavirus: हॉटेल, लॉजला ३३ टक्के जागा मिळणार, महापालिकेची अट, प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

coronavirus: हॉटेल, लॉजला ३३ टक्के जागा मिळणार, महापालिकेची अट, प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

मुंबई : ‘पुनश्च हरिओम’च्या पाचव्या टप्प्यात बुधवारपासून मुंबईतीलहॉटेल्स, लॉज, आणि गेस्ट हाउस सुरू करण्याची परवानगी महापालिकेने दिली आहे. मात्र सध्या केवळ ३३ टक्के जागेचा वापर करण्याची सूट देण्यात आली आहे. प्रतिबंधित क्षेत्रांना मात्र यामधून वगळण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक पालिका प्रशासनाने मंगळवारी काढले. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर २३ मार्चपासून मुंबईत लॉकडाऊन करण्यात आले.
या काळात हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाउस बंद असल्याने त्यांचा वापर कोरोनाच्या संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी केला जात आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या आता नियंत्रणात येत असल्याने लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येत आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत आतापर्यंत सम - विषम पद्धतीने दुकाने, मंडई सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आता निवासाची व्यवस्था असलेल्या हॉटेल, लॉज आणि विश्रामगृहांचे द्वार खुले करण्यात येणार आहेत. सध्या त्यांना केवळ ३३ टक्के जागेचा वापर करता येणार आहे. तर उर्वरित ६७ टक्के जागेचा वापर आवश्यकतेनुसार संशयित रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी वापरण्यात येईल.

असे आहेत नियम
हॉटेलमध्ये व आवारात तसेच पार्किंग परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी घेणे. सोशल डिस्टन्स पाळला जाईल, अशा पद्धतीने हॉटेलमध्ये आसन व्यवस्था करणे.
प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंग तसेच रिसेप्शनच्या टेबलवर प्रोटेक्टीव ग्लास बंधनकारक आहे.
रिसेप्शनच्या टेबलवर तसेच विश्रामगृहात व हॉटेलमधील सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्थाकरण्यात यावी.
पाहुणे व कर्मचाऱ्यांना स्वसंरक्षण किट, मास्क, ग्लोव्हज् पुरविण्यात यावेत.
हॉटेलमध्ये संपर्कविरहित उदाहरणार्थ क्यू आर कोड, आॅनलाइन फॉर्म, डिजिटल पेमेंट याचा वापर करावा.
लिफ्टमध्ये पाहुण्यांची संख्या सोशल डिस्टन्सदृष्टीने मर्यादित ठेवावी.

लहान मुलांचे खेळण्याचे ठिकाण, स्विमिंग पूल, व्यायाम शाळा बंद ठेवण्यात येतील. तसेच हॉटेलमध्ये पार्टी, मोठ्या कार्यक्रमांना परवानगी नसेल. त्याचबरोबर वेळोवेळी प्रत्येक रूमचे निर्जंतुकीकरण करणे, प्रसाधनगृह, पाणी पिण्याचे ठिकाण व हात धुण्याचे ठिकाण यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.
विश्रामगृहामध्ये लक्षणे नसलेल्या पाहुण्यांना राहण्याची परवानगी द्यावी. मात्र मास्कचा वापर बंधनकारक असेल. तसेच येणाºया पाहुण्यांच्या प्रवासाचा रेकॉर्ड, आरोग्याची माहिती, ओळखपत्र आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म रिसेप्शनवर देणे बंधनकारक आहे. पाहुण्यांनी ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप वापरणे बंधनकारक आहे. 
एखादा पाहुणा आजारी असल्यास त्याच्या राहण्याची वेगळी व्यवस्था करावी. तसेच पालिकेच्या अथवा राज्याच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Hotels, lodges will get 33% space, municipal condition, ban in restricted areas maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.