CoronaVirus News: तळीरामांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबईत मिळणार घरपोच दारू; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 07:32 PM2020-05-22T19:32:40+5:302020-05-22T19:34:45+5:30

मुंबईत घरपोच दारू विक्री करण्यास पालिकेची परवानगी

coronavirus Home delivery of liquor allowed in Mumbai except in containment zones kkg | CoronaVirus News: तळीरामांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबईत मिळणार घरपोच दारू; पण...

CoronaVirus News: तळीरामांसाठी आनंदाची बातमी! आता मुंबईत मिळणार घरपोच दारू; पण...

Next

मुंबई: आता मुंबईतही दारूची विक्री सुरू होणार आहे. मात्र दारूची विक्री दुकानांमध्ये केली जाणार नाही. ग्राहकांना दारू घरपोच करण्यात येईल. मात्र कंटन्मेंट झोनमध्ये दारू घरपोच केली जाणार नाही. याबद्दलचं परिपत्रक मुंबई महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलं आहे. परमिट असलेल्या व्यक्तींनाच घरपोच दारू मिळेल. 

'महाराष्ट्र सरकारनं दारू विक्रीला परवानगी दिली आहे. दुकानदारांनी ग्राहकांच्या राहत्या घरी दारू पोहोचवावी. परमिट असलेल्या ग्राहकांनाच दारू देण्यात यावी. यासाठीचे नियम घालून देण्यात आले असून त्यांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं,' असं परिपत्रकात नमूद करण्यात आलं आहे. २२ मेच्या (आज) रात्री १२ वाजल्यापासून या परिपत्रकाची अंमलबजावणी सुरू होईल.

राज्य सरकारनं १५ मेपासूनच राज्यात दारूची घरपोच विक्री सुरू केली आहे. मात्र मुंबईमध्ये अद्याप याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली नव्हती. तसे आदेश मुंबई महापालिकेनं काढले नव्हते. आज याबद्दलचं परिपत्रक पालिकेनं प्रसिद्ध केलं. राज्यातल्या ३६ पैकी २७ जिल्ह्यांमधील दारूची दुकानं सुरू झाली आहेत. राज्यात दारूची १० हजार ७९१ दुकानं असून यापैकी ४ हजार ७१३ दुकानं सध्या सुरू आहेत.

"...अन्यथा देशात कोरोनामुळे आतापर्यंत ६८ हजार जणांचा मृत्यू झाला असता"

पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"

भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

Web Title: coronavirus Home delivery of liquor allowed in Mumbai except in containment zones kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.