coronavirus: मुंबईतील जी उत्तर विभाग पुन्हा बनतोय हॉट स्पॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 22:51 IST2021-03-24T22:51:11+5:302021-03-24T22:51:52+5:30
coronavirus in Mumbai : दोन महिन्यांपूर्वी कोरोना मुक्तीचा मार्गावर असलेल्या धारावी, माहीम, दादर या विभागात पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

coronavirus: मुंबईतील जी उत्तर विभाग पुन्हा बनतोय हॉट स्पॉट
मुंबई - दोन महिन्यांपूर्वी कोरोना मुक्तीचा मार्गावर असलेल्या धारावी, माहीम, दादर या विभागात पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. बुधवारी दिवसभरात जी उत्तर विभागात २१२ बाधित रुग्णांची नोंद झाली. यामध्ये धारावीमध्ये सर्वाधिक ६२, दादर परिसरात ६४ तर माहीम परिसरात ८६ बाधित रुग्ण सापडले आहेत. (The G north sector of Mumbai is becoming a hot spot again)
कोरोनाचा प्रसार मार्च २०२० मध्ये झाल्यानंतर जी उत्तर विभाग म्हणजेच धारावी, दादर आणि माहीम परिसर हॉटस्पॉट बनला होता. मात्र, आशिया खंडातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग, मिशन झिरो अशी मोहीम राबवून कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणला, धारावी पॅटर्नने तर जागतिक स्तरावर आदर्श निर्माण केला.
सप्टेंबर महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली. धारावी, दादर, माहीममध्ये अनेकवेळा शून्य रुग्णांची नोंद झाली. मात्र गेल्या महिन्यापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धारावी, दादर आणि माहीम भागातही रुग्ण वाढ अधिक आहे. मध्यवर्ती ठिकाण असल्याने दादर भागात गर्दी होत असते. या परिसरातील फेरीवाल्यांची तसेच ग्राहकांचीही चाचणी करण्यात येत आहे. परिणामी, रुग्ण संख्या वाढल्याचे दिसून येते, असा दावा पालिका अधिकारी करीत आहेत.
२४ मार्च रोजी स्थिती
परिसर....एकूण....सक्रिय....डिस्चार्ज...
दादर....५६०३....३८२.....५०५५
धारावी....४५३१....२३७....३९७७
माहीम....५६१३....४७९....४९७९