Join us
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: आधी बहीण, नंतर आईचे निधन; आता पोलिसाचाही कोरोनामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 11:45 IST

एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 मुंबई - कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असलेल्या वडाळा टी टी येथील पोलीस नाईकचा कोरोनामुळे मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे त्यांनी गेल्या महिन्यात कोरोनामुळे आधी बहिण नंतर आईला गमावले होते.  एकाच घरातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

वडाळा ट्रक टर्मिनस येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक सोहिल अझीझ शेख (४०) यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. ते भेंडीबाजार परिसरात कुटुंबियासोबत राहायाचे. दीड महिन्यापूर्वी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर ते रजेवर होते. सुरूवातीला जे जे रुग्णालयात उपचार सुरु झाले. त्यात आईं आणि बहिणीलाही बाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. 

याच दरम्यान गेल्या महिन्यात आधी बहिणीचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ आईचेही निधन झाल्याने शेख आणखीन खालावले. जे जे मधून सोमय्या रुग्णालयात त्यांना हलविण्यात आले. यातच दीड महिन्यापासून मृत्यूशी सुरु असलेला लढ़ा संपला. त्यांना दम्याचाही आजार होता. एकामागोमाग एक तीन जण गमावल्याने त्यांच्या कुटुंबियाना धक्का बसला आहे. 

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस