Join us  

Coronavirus : बनावट वेळापत्रके सोशल मीडियावर व्हायरल, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे विद्यापीठाचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 4:29 PM

Coronavirus : समाज कंटकाकडून खोटी वेळापत्रके विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या WhatsApp ग्रुपवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

मुंबई - कोरोनाच्या राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन सरकारच्या निर्देशाप्रमाणे मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागाच्या सर्व प्रकारच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुंबई विद्यापीठाकडून यासबंधीत परिपत्रक ही काढण्यात आले असून पुढील निर्देशाप्रमाणे निर्णय घेऊन परीक्षांचे वेळापत्रक तयार करण्यात येईल अशा सूचनाही विद्यापीठाकडून देण्यात आल्या आहेत. तरी काही समाज कंटकाकडून खोटी वेळापत्रके विद्यार्थी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या WhatsApp ग्रुपवर व्हायरल होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.

पालक आणि विद्यार्थी, शिक्षकांनी यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पुन्हा एकदा विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच प्रकारच्या परीक्षा लांबणीवर पडल्याने विद्यार्थी आणि पालक वर्ग आधीच चिंताग्रस्त आहे. नवीन वेळापत्रक कधी जाहीर होणार, त्यानुसार परीक्षा कधी होणार आणि त्याचा निकाल  कधी लागणार याची उत्सुकता पालक विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेल्या खोट्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवत ती अजून पुढे पाठविली जात आहेत. 

विद्यापीठ परीक्षेबाबत तसेच काही महाविद्यालयाचे  लेटरहेड मॉर्फ (Morph)  करून महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात चुकीचे संदेश समाजमाध्यमातून फिरत आहेत. त्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देऊ नये. उन्हाळी सत्राच्या परीक्षेसंदर्भात १४ एप्रिलनंतर शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परीस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे विद्यार्थी, पालक , शिक्षक, प्रचार्यानी समाज माध्यमावर फिरणाऱ्या खोट्या परिपत्रकावर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : 'कोरोनासाठी लॉकडाऊन गरजेचे मात्र अंमलबजावणीची पद्धत चुकीची' 

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी TikTok चा पुढाकार, 100 कोटींची केली मदत

Coronavirus : चिंताजनक! जगभरात तब्बल 9,36,204 कोरोनाग्रस्त; इटली, स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू

Coronavirus : 10 दिवस 'तो' कोरोनाविरोधात लढला आणि अखेर जिंकला, म्हणाला...

Coronavirus : कोरोनामुळे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तीचा मृत्यू

Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई विद्यापीठपरीक्षाविद्यार्थी