coronavirus: Covid-19 diagnostic screening center set up in Borivali in western suburbs | coronavirus : पश्चिम उपनरात बोरिवलीमध्ये उभारले पाहिले कोविड-१९ डायग्नोस्टिक स्क्रिनिंग सेंटर

coronavirus : पश्चिम उपनरात बोरिवलीमध्ये उभारले पाहिले कोविड-१९ डायग्नोस्टिक स्क्रिनिंग सेंटर

- मनोहर कुंभेजकर
मुंबई--पालिकेने उभारलेल्या पण उदघाटन न झालेल्या बोरिवली पश्चिमेच्या पंजाब  लेन येथील जागेचा उपयोग करून येथे पालिकेच्या पश्चिम उपनरातील बोरिवलीच्या पंजाबी लेन येथे उभारलेल्या कोविड-१९ डायग्नोस्टिक स्क्रिनिग सेंटरचे उदघाटन शुक्रवारी करण्यात आले.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून वेळीच कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी बोरिवली पश्चिमेच्या पंजाब  लेन येथे कोविड-१९ डायग्नोस्टिक सेंटरचे शुक्रवारी सकाळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी पुढाकार घेऊन व लोकसहभागातून येथील पालिकेच्या जागेत नागरिकांसाठी उभारलेले हे पश्चिम उपनगरातील पहिलेच डायग्नोस्टिक सेंटर आहे.

बोरिवली पश्चिम,पंजाबी लेन येथील हाकेच्या अंतरावर उभारलेल्या या सेंटरमध्ये तळमजल्यावर सुमारे १०००० चोफूट जागेत कोरोनाची जर लक्षणे जाणवत असतील तर त्या नागरिकांची स्क्रीनिग टेस्ट करण्यात येईल.जर नागरिकांना तपासणीत कोरोनाची जर लक्षणे आढळल्यास पहिल्या मजल्यावरील सुमारे ३०००० चोफूट जागेत विलगीकरण कक्ष उभारण्यात येत असून याठिकाणी कोरोना संशयीत रुग्णांना ठेवण्यात येईल.आणि जर कोरोनाचा पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्यांना कस्तुरबा आणि अन्य मोठ्या रुग्णांलयात उपचारासाठी ठेवण्यात येईल अशी माहिती खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला दिली.

यावेळी आमदार विलास पोतनीस,नगरसेवक  प्रवीण शहा, प्रभाग समिती अध्यक्ष संध्या दोशी,पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे,नगरसेविका बीना दोशी,पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार,डॉ वाडीवाला उपस्थित होते.

बोरिवली मेडिकल ब्रदरहुडचे अध्यक्ष डॉ. निमेश  मेहता, डॉ. बिपिन दोशी व दहिसरच्या केव्हीओ मानव कल्याण केंद्र, नवनीत हॉस्पिटलचे अध्यक्ष  नेम्जीभाई गंगर आदींची  टीम संयुक्तपणे येथील कोरोना व्हायरस स्क्रीनिंग सेंटरचे व्यवस्थापन पाहणार असल्याची माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.

येथील पोयसर जिमखान्याने सामाजिक बांधिलकी दाखवत डायग्नोस्टिक सेंटरला ५१ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली असून २५लाख रुपयांचा धनादेश आज देण्यात आला.कपोल समाज महावीर नगर, डहाणूकर वाडी यांनी वैद्यकीय उपकरणे व पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

यावेळी प्रसिद्ध अभिनेते  शरद पोंक्षे व अविनाश नारकर आणि डॉ. योगेश दुबे, दिलीप पंडित, डॉ. नीलू जैन, सीए चेतन शाह, राजू अहिया, नयनेश शहा व येथील नागरिक उपस्थित होते.

Web Title: coronavirus: Covid-19 diagnostic screening center set up in Borivali in western suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.