Coronavirus: महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा राज्यांत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 04:26 AM2020-06-30T04:26:15+5:302020-06-30T04:26:30+5:30

नीरज हातेकर : केरळ, तेलंगणा, कर्नाटक, आसाममध्ये परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे

Coronavirus: Coronavirus is under control in Maharashtra, Punjab and Haryana | Coronavirus: महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा राज्यांत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात

Coronavirus: महाराष्ट्रासह पंजाब, हरयाणा राज्यांत कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात

Next

सीमा महांगडे

मुंबई: मध्य प्रदेश सद्यपरिस्थितीत देशातील इतर कोरोनाग्रस्त राज्यांपेक्षा कोरोनाच्या बाबतीत उत्तम स्थितीत असल्याचे समोर येत आहे. मध्य प्रदेशातील डबलिंग पिरियड इतर राज्यांपेक्षा जास्त असून रिप्रॉडक्शन रेट हा अत्यंत कमी आहे. तसेच या राज्याचा संसर्ग पसरण्याचा दर हा राष्ट्रीय पातळीवरील सरासरीपेक्षा कमी असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. याच वेळी पंजाब, हरयाणा महाराष्ट्र यांसारख्या राज्यात ही कोरोनाची स्थिती आटोक्यात येत असली तरी येथे संसर्ग पसरण्याचा दर हा राष्ट्रीय दरापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

केरळ, कर्नाटक, हिमाचल आणि आसामसारख्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता अहवालातून मांडण्यात आली आहे. या अहवालासाठी गेल्या ३ महिन्यांपासून मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्राध्यापक नीरज हातेकर व त्यांच्या सहायक प्राध्यापिका पल्लवी बेल्हेकर यांनी देश-विदेशातील कोरोना प्रभावित भागांचा अभ्यास करण्यात आला आहे.
या अहवालामध्ये विविध देशांतील व राज्यांतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे आणि दुपटीच्या संक्रमण प्रमाणाचा अभ्यास करून अंदाज काढण्यात आला आहे   बिहार आणि पंजाबसारख्या राज्यांतही मध्य प्रदेशसारखीच स्थिती असून ही राज्येही कोरोनाच्या विळख्यापासून स्वत:ला सोडवून घेण्यात यश मिळवीत आहेत. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात ही परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना संक्रमित होण्याचा दर या राज्यात राष्ट्रीय पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मध्य प्रदेशसारखी स्थिती या राज्यांत येण्यास अद्याप थोडा वेळ लागेल, असे नीरज हातेकर यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

अहवालात सादर केलेल्या ग्राफिक्सप्रमाणे येथील लोकसंख्याही जास्त असल्याने लोकसंख्येचा खूप मोठा भाग मोठ्या प्रमाणावर संक्रमित झाली आहे. तेलंगणा राज्यातील डबलिंग पिरियड ही जास्त आहे तर संक्रमणाचा दर ही राष्ट्रीय पातळीपेक्षा जास्त असल्याने येथील परिस्थिती गंभीर असल्याचे हातेकर यांनी म्हटले आहे. तामिळनाडू , दिल्ली, हरयाणा या राज्यांतील परिस्थितीही अशीच असल्याचे हातेकर यांनी स्पष्ट केले.  केरळ, कर्नाटक, आसाम, हिमाचल प्रदेश या राज्यांत इन्फेक्टिव्हिटी डिग्री कमी असली तरी संक्रमण पसरण्याचा दर हा राष्ट्रीय पातळीपेक्षा अधिक आहे. या राज्यांचा डबलिंग पिरियड कमी असला तरी रिप्रॉडक्शन रेट अधिक आहे. त्यामुळे संसर्ग खूप वेगाने येथे पसरत असल्याने येणाऱ्या काळात या राज्यांत पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता असल्याचे नीरज हातेकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे या राज्यांतील धोरण ठरविताना केवळ रुग्णसंख्या कमी कशी होईल यावर लक्ष न देता कोरोना संसर्ग पसरणार नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 

कोरोना संक्रमणाचा दर अधिक
अहवालामध्ये विविध देशांतील व राज्यांतील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा कमी होण्याचे आणि दुपटीच्या संक्रमण प्रमाणाचा अभ्यास करून अंदाज काढण्यात आला आहे   बिहार आणि पंजाबसारख्या राज्यांतही मध्य प्रदेशसारखीच स्थिती असून ही राज्येही कोरोनाच्या विळख्यापासून स्वत:ला सोडवून घेण्यात यश मिळवीत आहेत. गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातही परिस्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना संक्रमित होण्याचा दर या राज्यात राष्ट्रीय पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मध्य प्रदेशसारखी स्थिती या राज्यांत येण्यास थोडा वेळ लागेल.

Web Title: Coronavirus: Coronavirus is under control in Maharashtra, Punjab and Haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.