Coronavirus: खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही होईल कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 02:47 AM2020-07-04T02:47:47+5:302020-07-04T06:54:33+5:30

आतापर्यंत देशात एकूण ९०,५६,१७३ लोकांच्या कोरोना चाचण्या पार पडल्या असून, लवकरच ही संख्या एक कोटीच्या पुढे जाईल, असे आयएमसीआरने स्पष्ट केले.

Coronavirus: Coronavirus testing will also be done on a private doctor's prescription; Decision of the Ministry of Health | Coronavirus: खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही होईल कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

Coronavirus: खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही होईल कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

Next

मुंबई : कोरोनाविरुद्धच्या लढाईत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठे पाऊल उचलले असून मंत्रालयाच्या नव्या नियमानुसार आता खासगी डॉक्टरांनाही एखाद्या रुग्णाला कोरोना चाचणीसाठी पाठवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे कोरोना चाचण्यांवर भर देण्याचा केंद्राचा निर्णय खऱ्या अर्थाने लागू होण्यासाठी मदत होईल.

राज्य सरकारचे प्रतिनिधी आणि तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्राने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केवळ सरकारी डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवरच कोरोना चाचणीची परवानगी मिळत होती. आयएमसीआरच्या नियमावलीनुसार एखाद्या रुग्णाला कोरोनाची लक्षणे दिसत असतील, तर आता खासगी डॉक्टरही त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ला देऊ शकतो. यासोबतच, केंद्राने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचित केले आहे की, आपापल्या प्रांतामधील कोरोना चाचणी करणाºया प्रयोगशाळांचा पूर्ण क्षमतेने वापर करून घ्या.

राज्यात ११४ प्रयोगशाळा
आतापर्यंत देशात एकूण ९०,५६,१७३ लोकांच्या कोरोना चाचण्या पार पडल्या असून, लवकरच ही संख्या एक कोटीच्या पुढे जाईल, असे आयएमसीआरने स्पष्ट केले. सध्या देशात ७६७ सरकारी आणि २९७ खासगी अशा एकूण १०६५ कोरोना चाचणी करणाºया प्रयोगशाळा आहेत.

Web Title: Coronavirus: Coronavirus testing will also be done on a private doctor's prescription; Decision of the Ministry of Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.