Join us  

Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीला पहिल्यांदा लावणार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 12:01 PM

Lockdown: देशातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी बैठक होणार आहे.

ठळक मुद्देशपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतली होती सोनिया गांधींची भेटएनडीएतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना अधिकृतपणे यूपीएचा घटक पक्ष बनला नाही राज्यपालांच्या बैठकीला गैरहजेरी लावणारे मुख्यमंत्री सोनियांच्या बैठकीला उपस्थित राहणार

नवी दिल्ली – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांच्या बैठकीला गैरहजेरी लावणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरोना संकटाकाळी लॉकडाऊन ४ मध्ये केंद्र सरकारने काही प्रमाणात शिथिलता आणल्यानंतर विरोधी पक्षही आता राजकीय दृष्ट्या सक्रीय होताना दिसत आहे.

देशातील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात शुक्रवारी बैठक होणार आहे. या बैठकीला प्रमुख विरोधी पक्षातील नेते उपस्थित असतील. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत.

शिवसेना हा राष्ट्रीय स्तरावर यूपीएचा घटक पक्ष नाही. मागील वर्षी एनडीए सरकारमधून बाहेर पडल्यानंतर शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकांवरुन काँग्रेसला मदत करत आहे. शिवसेनेचे लोकसभेत १८ सदस्य निवडून आलेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, मी आणि मुख्यमंत्री दोघं या बैठकीत सहभागी होणार आहोत.  

शपथ घेतल्यानंतर दिल्लीत घेतली होती भेट

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. याशिवाय उद्धव यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोनदा सोनिया गांधींची भेट घेतली आहे. पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी त्यांना आमंत्रित करण्याची आणि दुसऱ्यांदा जेव्हा ते राहुल गांधींना भेटायला आले होते.

विरोधी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी, द्रमुकचे नेते स्टालिन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोकशाही जनता दलाचे नेते शरद यादव, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव हे या विरोधी बैठकीस उपस्थित राहतील. झारखंडचे मुख्यमंत्री आणि झामुमोचे नेते हेमंत सोरेन आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचाही यात सहभाग असल्याचे बोललं जात आहे. याशिवाय कॉंग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीला उपस्थित राहू शकतात.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

अखेर आईचं प्रेम जिंकलं! ३२ वर्षापूर्वी हरवलेला मुलगा पुन्हा सापडला; काय घडलं होतं ‘त्या’ दिवशी?

ठाकरे सरकारचा कोट्यवधीचा घोटाळा, कंत्राटदार मालामाल; भाजपा नेत्याचा गंभीर आरोप

भाजपाच्या माजी खासदाराची वेगळ्या राज्याची मागणी; पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र

मुंगीचा रंग हिरवा नाही, हेच खरे रहस्य आहे; शिवसेनेचा भाजपावर गंभीर आरोप

‘या’ मास्कच्या संपर्कात येताच कोरोना व्हायरस नष्ट होणार; संशोधनाला मिळणार यश?

देशांतर्गत विमानसेवेची सोमवारपासून भरारी, केंद्राची घोषणा

टॅग्स :उद्धव ठाकरेसोनिया गांधीकोरोना वायरस बातम्यासंजय राऊत