अखेर आईचं प्रेम जिंकलं! ३२ वर्षापूर्वी हरवलेला मुलगा पुन्हा सापडला; काय घडलं होतं ‘त्या’ दिवशी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:17 AM2020-05-21T11:17:39+5:302020-05-21T11:24:43+5:30

आईच्या प्रेमासमोर सर्व काही हरवले जाते. एकीकडे जगभरात कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहे तर ज्या चीन शहरातून हा व्हायरस जगभरात पसरला त्याठिकाणी असा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे अनेकजण भावूक झाले आहेत.

एक अशी आई जी ३२ वर्षांपासून आपल्या मुलाची वाट पाहत होती. प्रत्येकाने त्या आईला आशा सोडून देण्यास सांगितले, परंतु आईला विश्वास होता की, एक ना एक दिवस माझा मुलगा मला भेटेल. अखेर त्या आईचा विश्वास जिंकला.

२ वर्षापूर्वी हरवलेला मुलगा जेव्हा ३ दशकानंतर आईसमोर उभा राहिला त्यावेळी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं. हे फोटो पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

ही भावनिक घटना चीनमधून समोर आली आहे. येथे राहणाऱ्या ६० वर्षीय महिलेने ३२ वर्षानंतर आपल्या मुलाच्या डोळ्यासमोर पाहिले. यानंतर, ना आईच्या डोळ्यातून अश्रू थांबले ना मुलाच्या. तिथे उपस्थित सर्वांचे डोळे पाण्याने भरले.

चीनमध्ये राहणाऱ्या ली जिंजीझीने आयुष्याची ३२ वर्षे आपल्या मुलाच्या शोधात घालविली. यावेळी, या आईने चीनच्या प्रत्येक रस्त्याच्या प्रत्येक गल्लीमध्ये आपल्या मुलाचा शोध घेतला, परंतु तिला यश मिळाले नाही. काही वेळा ली आशा सोडत असे पण आईने हार मानली नाही.

आता ३२ वर्षानंतर पोलिसांना लीचा मुलगा जियाला एका कुटुंबात सापडला ज्यांनी त्याला ३२ वर्षांपूर्वी मानवी तस्करांकडून ६४ हजार रुपयांत विकत घेतले.

माहितीनुसार लीचा मुलगा ३२ वर्षांपूर्वी हरवला होता. त्यावेळी तो फक्त २ वर्षांचा होते. मुलाचे मानवी तस्करांनी अपहरण केले होते. बऱ्याच वर्षानंतर आईला पाहून मुलगाही भावूक झाला होता

१७ ऑक्टोबर १९८८ रोजी जिया जिया आपले वडील माओसमवेत घराबाहेर खेळत होता. पण वडिलांचे लक्ष दुसरीकडे गेल्याने तस्करांनी त्यांच्या मुलाचं अपहरण केले.

त्यानंतर आई-वडिलांनी जियाचा शोध सुरू केला होता. ३२ वर्षांत, त्यांनी चीनचा प्रत्येक रस्ता आणि परिसर शोधला. जिथे जिथे माहिती मिळाली तेथे ते पोहोचत असत. पण प्रत्येक वेळी त्यांच्या पदरी निराशा आली.

गेल्या महिन्यात पोलिसांना कळले की ज्या वर्षी जिया हरवला होता त्याच वर्षी एका कुटुंबाने तस्करांकडून दोन वर्षाच्या मुलाची खरेदी केली. यानंतर पोलिसांनी घरातील सदस्यांची चौकशी केली आणि अखेर जिया सापडला.

जियाला आपल्या समोर पाहिल्यावर आईची खूप वाईट अवस्था झाली होती. या ३२ वर्षात लीने आपला मुलगा शोधण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. ३४ वर्षीय जियाने माध्यमांना सांगितले की, ६ वर्षांपूर्वी मी टीव्हीवर आईला पाहिले, जिथे ती एका मुलाचे चित्र दाखवत होती. पण तेव्हा मी ओळखू शकलो नाही.

जियासुद्धा आपल्या आईला भेटून आनंदी आहे. परंतु त्याने माध्यमांना सांगितले की तो आपल्या खऱ्या पालकांसमवेत थोडा वेळ घालवेल आणि मग तो आपल्या दत्तक कुटुंबाकडे परत जाईल.

Read in English

टॅग्स :चीनchina