Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : संकटाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा- राज्यपाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 02:50 IST

coronavirus: गुढी पाडव्याचा मंगल सणआपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. घरी रहा आणि सुरक्षित रहा ! नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो.

मुंबई : गुढी पाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होत असतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकट प्रसंगातून जात आहे. राज्य शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे कार्य होणे शक्य नाही. यासाठी शासनाला संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन मी सर्व नागरिकांना करीत आहे, असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितले़गुढी पाडव्याचा मंगल सणआपण आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. घरी रहा आणि सुरक्षित रहा ! नवे वर्ष सर्वांकरीता सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो अशा सर्वांना शुभेच्छा देतो.  युगादि, चेती चाँद तसेच संवर पाडवो निमित्ताने देखील मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारीयांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

टॅग्स :महाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस