coronavirus : जंतूनाशकांची फवारणी थांबवण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा, भाजपा आमदाराची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:57 PM2020-03-31T13:57:04+5:302020-03-31T14:00:36+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक ठिकाणी जंतूनाशकांची फवारणी सुरू आहे.

Coronavirus : BJP MLA Amit Satam criticizes Maharashtra Government for stoping stop spraying pesticides | coronavirus : जंतूनाशकांची फवारणी थांबवण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा, भाजपा आमदाराची टीका

coronavirus : जंतूनाशकांची फवारणी थांबवण्याचा शासनाचा निर्णय चुकीचा, भाजपा आमदाराची टीका

googlenewsNext

 मुंबई--जंतूनाशकांची फवारणी आवश्यकता असल्यास पालिकाच करणार असून सोसायट्यांनी स्वतः फवारणी करू नये असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी कोरोनासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या बैठकीत ठरले.यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अँड.अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपास्थित होते.

सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याची जोरदार टिका अंधेरी (पश्चिम) येथील भाजपा आमदार अमित साटम यांनी केली. मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट असते तेव्हा ते फक्त संघर्ष करणार्‍या सरकारी संस्थाच नसतात, तर एनजीओ, सामाजिक गट, राजकीय संस्था अशा अनेक माध्यमांद्वारे लोक या संकटाला तोंड देण्यासाठी सहभागी होतात आणि हिररीने मदत करतात असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक ठिकाणी जंतूनाशकांची फवारणी सुरू आहे. मात्र युद्धपातळीवर  सुरू असलेल्या स्वच्छताविषयक कारवायांवर बंदी घालण्याचा निर्णय सरकार कशी घेऊ शकते?असा सवाल आमदार अमित साटम यांनी केला आहे.

 सोडियम हायपोक्लोराईड, डेटॉल, सव्हेलॉन रेग मनुष्यांना काय नुकसान करू शकते? तसे असल्यास, ते वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झाले आहे का?पालिका आणि इतर शहरी स्थानिक संस्था सर्व बीएलडीजी / सोसायटी / चाळीपर्यंत पोहोचू शकतात? का त्यांच्याकडे बॅन्डविड्थ आहे का? नसल्यास, आपण लोकांना  कसे काय रोखू शकता? असा सवाल त्यांनी केला आहे.सध्याच्या कोरोनाच्या विरोधात नागरिक स्वतः त्यांच्या आवारात आणि सोसायटीत स्वच्छता करुन स्वतःचे रक्षण करत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

 दररोज बरेच विक्रेते, अभ्यागत कॉम्प्लेक्समध्ये भेट देतात, विविध धातूंच्या पृष्ठभागाला स्पर्श करतात जसे लॉबी क्षेत्र, लिफ्ट इ. आणि झोपडपट्ट्यांमधील धातूच्या जिन्यादेखील आहेत?अश्या ठिकाणी सरकार नागरिकांचे संरक्षण करण्यापासून कसे रोखू शकते?सरकारच्या या चुकीच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Web Title: Coronavirus : BJP MLA Amit Satam criticizes Maharashtra Government for stoping stop spraying pesticides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.