coronavirus: All 'Essential Service Pass' valid till April 15! - police spokesperson Pranay Ashok | coronavirus : सर्व 'एसेंशीयल सर्व्हिस पास' १५ एप्रिलपर्यंत व्हॅलीड ! पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांची माहिती

coronavirus : सर्व 'एसेंशीयल सर्व्हिस पास' १५ एप्रिलपर्यंत व्हॅलीड ! पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांची माहिती

- गौरी टेंबकर - कलगुटकर

मुंबई - देशात सांचारबंदी लागू असताना अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्याना 'एसेंशीयल सर्व्हिस पास' स्थानिक पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मात्र या पासेसवर असलेल्या वेगवेगळ्या तारखांमुळे पुन्हा त्याचे नविनिकरण करण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. मात्र या पासेसची व्हॅलेडिटी ही १५ एप्रिलपर्यंत असल्याची माहिती मुंबई पोलीस प्रवक्ते प्रणय अशोक यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली आहे. 

स्थानिक पोलिसांनी अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या हजारो लोकांना अद्याप 'एसेंशीयल सर्व्हिस पास' देऊ केला आहे. जेणेकरून सर्वसामान्यांची गैरसोय टाळता येईल. मात्र या पासेसवरील वेगवेगळ्या तारखामुळे पुन्हा या लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांच्या पासवर १ एप्रिल तर काहींच्या १५ एप्रिल ही व्हॅलेडिटी तारीख दाखविण्यात आली आहे. त्यामुळे आता १ एप्रिलला व्हॅलेडिटी संपलेल्या लोकांकडून तारखेचे नूतनिकरण करण्यासाठी पुन्हा पोलीस ठाण्यात गर्दी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या गर्दीमुळे पोलिसांना पुन्हा 'सोशल डिस्टन्सिंग' राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे ज्यांच्या पासवर १ एप्रिल ही तारीख आहे तो पास १५ एप्रिलपर्यंत व्हॅलीड  समजण्यात यावा, अशी विनंती पोलीस तसेच 'एसेंशीयल सर्व्हिस पास' धारकांकडून करण्यात येत आहे. 

मुळात कोरोनाचे संकट कधी टळणार याबाबत भारतासह अख्ख्या जगात अनिश्चितता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीला 'सोशल डीस्टंसिंग' राखण्याच्या उद्देशाने ३१ मार्च, २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषीत केला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  संचारबंदी तीन आठवडे वाढवली. त्यामुळे पासेसवर या दोन वेगवेगळ्या तारखा टाकण्यात आल्याचे, पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

...तर स्थानीक पोलीस ठाण्याला संपर्क करा!
स्थानीक पोलिसांनी दिलेले सर्व 'एसेंशीयल सर्व्हिस पास' हे सध्या तरी १५ एप्रिलपर्यत व्हॅलीड आहेत. त्यामुळे ज्यांचे पास १ एप्रिलला संपलेत त्यांनी काळजी करण्याचे कारण नाही. तरी एखाद्याला भीती वाटत असल्यास त्यांनी त्यांच्या समाधानासाठी त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याला संपर्क करावा.
( प्रणय अशोक - उपायुक्त, मुंबई पोलीस प्रवक्ते )

Web Title: coronavirus: All 'Essential Service Pass' valid till April 15! - police spokesperson Pranay Ashok

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.