Coronavirus : आज मध्य रेल्वेवरील ६६८, तर पश्चिम रेल्वेवरील ४७७ फेऱ्या रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 06:57 IST2020-03-22T01:44:09+5:302020-03-22T06:57:29+5:30
रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती केली जाणार नसल्याने, मध्य रेल्वेने रविवार, २२ मार्चचा मेगाब्लॉक रद्द केला आहे.

Coronavirus : आज मध्य रेल्वेवरील ६६८, तर पश्चिम रेल्वेवरील ४७७ फेऱ्या रद्द
मुंबई : मध्य आणि हार्बर मार्गावरील रविवारचा ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, जनता कर्फ्यू असल्याने, मध्य रेल्वे मार्गावरील ६६८, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील ४७७ लोकल फेºया रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती केली जाणार नसल्याने, मध्य रेल्वेने रविवार, २२ मार्चचा मेगाब्लॉक रद्द केला आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार-रविवारी रात्रकालीन जम्बोब्लॉक घेऊन रविवारी कोणताही दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नव्हता. मात्र, जनता कर्फ्यूमुळे काही फेºया रद्द करण्यात येतील.
मध्य रेल्वे मार्गावर रोज १७७४ लोकल फेºया होतात. मात्र आज ११०६ फेºया होतील. तर ६६८ फेºया रद्द करण्यात आल्या आहेत.
याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज १२७८ लोकल फेºया होतात. मात्र आज केवळ ८०१ फेºया होतील. तर ४७७ लोकल फेºया रद्द करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी-दादर पॅसेंजर, दादर-रत्नागिरी पॅसेंजर, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, मडगाव-रत्नागिरी पॅसेंजर, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर या कोकण रेल्वे मार्गवरही गाड्याही रविवारी रद्द करण्यात आल्या आहेत.