coronavirus: के पश्चिम वॉर्डमध्ये आढळले 5063 सक्रिय कोरोना रुग्ण, ९५ टक्के रुग्ण इमारतींत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:48 AM2021-04-03T03:48:13+5:302021-04-03T03:48:44+5:30

coronavirus: मुंबईत आज ५८४५५ सक्रिय कोरोना रुग्ण असताना त्यापैकी ५०६३  रुग्ण हे के पश्चिम वॉर्डमध्ये आहेत. सध्या या वॉर्डमध्ये असलेल्या ५०६३  सक्रिय कोरोना रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे इमारतींमधील असून ५ टक्के रुग्ण हे झोपडपट्टीमधील आहेत.

coronavirus: 5063 active corona patients found in K West ward, 95% of patients in buildings | coronavirus: के पश्चिम वॉर्डमध्ये आढळले 5063 सक्रिय कोरोना रुग्ण, ९५ टक्के रुग्ण इमारतींत

coronavirus: के पश्चिम वॉर्डमध्ये आढळले 5063 सक्रिय कोरोना रुग्ण, ९५ टक्के रुग्ण इमारतींत

Next

- मनोहर कुंभेजकर  

मुंबई : मुंबईत आज ५८४५५ सक्रिय कोरोना रुग्ण असताना त्यापैकी ५०६३  रुग्ण हे के पश्चिम वॉर्डमध्ये आहेत. सध्या या वॉर्डमध्ये असलेल्या ५०६३  सक्रिय कोरोना रुग्णांपैकी ९५ टक्के रुग्ण हे इमारतींमधील असून ५ टक्के रुग्ण हे झोपडपट्टीमधील आहेत. लोखंडवाला आणि टाटा कम्पाउंड परिसरात जास्त रुग्ण आहेत. के पश्चिम वॉर्डचे  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजित पांपटवार यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. 

साहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील २४४ प्रतिबंधित इमारती आणि १३७० प्रतिबंधित फ्लॅट्स सील करण्यात आले आहेत. तर गेल्या महिनाभरात येथील कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी येथील हॉटेल्स, मॉल्स, चित्रपटगृहे, सरकारी कार्यलयातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत अंदाजे १२० कोरोना रुग्ण आढळून आले, अशी माहिती डॉ. अजित पांपटवार यांनी दिली. येथील प्रतिबंधित इमारतीत पालिकेतर्फे आरोग्य शिबिर आणि कोरोना चाचणीचे आयोजन करण्यात येते, तसेच प्रतिबंधित इमारतीत सॅनिटायझेशन व  सामुदायिक शौचालयांच्या ठिकाणीही सॅनिटायझेशन करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली. 

के पश्चिम वॉर्डतर्फे कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यात येत असून येथील वॉर रूम २४ तास सुरू आहे. नागरिकांनी पॅनिक होऊ नये तसेच सतत मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, हात धुणे या त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन विश्वास मोटे यांनी केले आहे.
 

Web Title: coronavirus: 5063 active corona patients found in K West ward, 95% of patients in buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.