Coronavirus in Mumbai: कस्तुरबा हॉस्पिटलचा नवा रेकॉर्ड; कोरोना चाचण्यांचा आकडा पाहून हात जोडाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2020 10:51 IST2020-03-26T03:18:17+5:302020-03-26T10:51:46+5:30
coronavirus : कोरोना जसजसा राज्यात पसरू लागला, त्यावेळी या आजाराचे महत्त्वाचे केंद्र हे मुंबई व पुणे शहर ठरले. त्यामुळे या मेट्रो शहरातील यंत्रणांनी अधिक सतर्कता पाळून रात्रीचा दिवस करून मोठ्या प्रमाणात यंत्रणा निर्माण केली आणि पहिल्या टप्प्यात कस्तुरबा, त्यानंतर अन्य पालिका रुग्णालयांत कोरोनासाठी सज्ज केली.

Coronavirus in Mumbai: कस्तुरबा हॉस्पिटलचा नवा रेकॉर्ड; कोरोना चाचण्यांचा आकडा पाहून हात जोडाल!
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक राज्यासह मुंबईत वाढतोय. मात्र तरीही या वाढत्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र राज्यासह पालिकेचा आरोग्य विभागही झटतो आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या कस्तुरबा रुग्णालयाच्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चमूच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. या चमूने अवघ्या चोवीस तासात कोरोनाच्या ३७२ वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे या अविरतपणे झटणाºया यंत्रणांना मुंबईकरांचा सलाम आहे.
कोरोना जसजसा राज्यात पसरू लागला, त्यावेळी या आजाराचे महत्त्वाचे केंद्र हे मुंबई व पुणे शहर ठरले. त्यामुळे या मेट्रो शहरातील यंत्रणांनी अधिक सतर्कता पाळून रात्रीचा दिवस करून मोठ्या प्रमाणात यंत्रणा निर्माण केली आणि पहिल्या टप्प्यात कस्तुरबा, त्यानंतर अन्य पालिका रुग्णालयांत कोरोनासाठी सज्ज केली. त्यानंतर रुग्णालयांप्रमाणे खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांचाही यात अंतर्भाव करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर आता खासगी-सरकारी प्रयोगशाळांतील कोरोना चाचण्यांची क्षमताही वाढविण्यात आली आहे.
कस्तुरबा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज तपासणीसाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या तपासण्या, अहवाल यांची गतीही वाढायला हवी, कमी वेळात अचूक अहवालासाठी काम करणाºया या चमूने मागील चोवीस तासांत हा नवा विक्रम नोंदविला आहे. यानंतर आता केईएम आणि कस्तुरबा रुग्णालयातील प्रयोगशाळांच्या चाचण्यांची क्षमताही वाढविण्यात आली आहे.
बाह्यरुग्ण विभागात दाखल झालेले रुग्ण 430
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण 103
मुंबईतील पॅझिटिव्ह रुग्ण 9
रुग्णालयात भरती असलेले रुग्ण 182
आतापर्यंत मुंबईतील मृत रुग्णांची संख्या 3