Coronavirus: 3 suspected patients of corona virus in Mumbai; Separate unit at Kasturba Hospital | Coronavirus : कोरोना व्हायरसचे मुंबईत २ संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

Coronavirus : कोरोना व्हायरसचे मुंबईत २ संशयित रुग्ण; कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष

ठळक मुद्देमुंबईमध्ये दोन संशयित कोरोना व्हायरस रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे. चीन मधून मुंबईत आलेल्या या दोन संशयित रुग्णाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता.

मुंबई - चीनमध्ये सुरुवात झालेला करोना व्हायरसचा भारतात प्रवेश होऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील सात विमानतळांवर चीन आणि आसपासच्या प्रदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने याविषयी माहिती दिली आहे. यात मुंबईसह, दिल्ली व कोलकाता या  आंतरराष्ट्रीय विमानतळांचा समावेश आहे. मात्र, मुंबईमध्ये दोन संशयित कोरोना व्हायरस रुग्ण आढळले असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे. हे दोघे संशयित रुग्ण चीनहून मुंबईत दाखल झाले आहेत.

जाणून घ्या corona virus'ची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय 


चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेने चिचंपोकळी येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या कक्षामध्ये कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांची तपासणी केली जात असून इथे त्याच्यावर उपचारही करण्यात येणार आहेत, असे मुंबई महानगर पालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Corona Virus : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 25 जणांचा मृत्यू, 830 जणांना संसर्ग

चीन मधून मुंबईत आलेल्या या दोन संशयित रुग्णाला खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत होता. यामुळे त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. चीनहून मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना व्हायरसची काही लक्षणे आढळल्यास त्यांना कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना विमानतळावरील डॉक्टरांना करण्यात आल्या असल्याचीही वैद्यकीय अधिकारी यांनी माहिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारकडून कस्तुरबा रुग्णालयाला कोरोना व्हायरससंबंधित रुग्णांना हाताळण्याविषयी सूचना देण्यात आल्या असल्याचे राज्य सरकारने कस्तुरबा रुग्णालय प्रशासनाला कळविले आहे.काय आहेत या व्हायरसची लक्षणं ?

या व्हायरसची लागण झाल्यानंतर ताप येणे, खोकला येणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे अशी लक्षणे आढळत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

Web Title: Coronavirus: 3 suspected patients of corona virus in Mumbai; Separate unit at Kasturba Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.