coronavirus: मुंबईत कोरोनाचे आणखी २५ बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 00:06 IST2020-05-15T00:06:35+5:302020-05-15T00:06:58+5:30
मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता गुरुवारी धारावीमध्ये कोरोनाची ३३ नवी प्रकरणे आढळली.

coronavirus: मुंबईत कोरोनाचे आणखी २५ बळी
मुंबई : कोरोनामुळे गुरुवारी मुंबईत २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १६ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील १८ रुग्ण पुरुष आणि ७ रुग्ण महिला होत्या. मृतांपैकी एकाचे वय ४० वर्षाखाली होते. १४ जणांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित १० रुग्ण ४० ते ६० वर्षादरम्यान होते.
मुंबई शहर आणि उपनगराचा विचार करता गुरुवारी धारावीमध्ये कोरोनाची ३३ नवी प्रकरणे आढळली. येथील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा १ हजार ६१ एवढा झाला.