coronavirus: हॉलंडला अडकलेले ११३ भारतीय सुखरुप भारतात, मायदेशी उतरताच कुटुंबीय भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 09:47 PM2020-03-22T21:47:42+5:302020-03-22T21:48:18+5:30

आमची लवकर येथून सुटका करा अशी विनंती या प्रवाश्यांनी गेली 3 दिवस विदेश मंत्रालय व पराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडे केली होती.

coronavirus: 13 Indian citizen trapped in Holland finally returned safely | coronavirus: हॉलंडला अडकलेले ११३ भारतीय सुखरुप भारतात, मायदेशी उतरताच कुटुंबीय भावुक

coronavirus: हॉलंडला अडकलेले ११३ भारतीय सुखरुप भारतात, मायदेशी उतरताच कुटुंबीय भावुक

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई-हॉलंडच्या अँमस्टरडम विमानतळावर गेली ३ दिवस अडकलेल्या ११३ भारतीय नागरिक आज रात्री खास विमानाने ८ वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखरूप परतले. त्यामुळे या नागरिकांसह त्यांच्या कुटुंबियानी सुटकेचा निःस्वारा सोडला आहे.विशेष म्हणजे या ११३ भारतीय नागरिकांमध्ये अनेक जेष्ठ नागरिक आणि एक गरोदर महिला देखिल होती.

आमची लवकर येथून सुटका करा अशी विनंती या प्रवाश्यांनी गेली 3 दिवस विदेश मंत्रालय व पराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडे केली होती. याप्रकरणी या अडकेल्या बोरिवली पश्चिम गोराई गावातील लिऑन किणी या  एका प्रवाश्यांचा भाऊ फ्रँकस्टन किणी यांनी माझ्या भावासह सर्व ११३  भारतीयांची लवकर सुटका करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशी विनंती केल्याचे वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.ग्रॉडफे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांना केली होती. आम्ही देखिल परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना ट्विट करत या ११३ प्रवाश्यांना लवकर भारतात घेऊन येण्याची मागणी केली होती असे त्यांनी लोकमतला सांगितले.

गेली तीन दिवस आम्ही अँमस्टरडम विमानतळावर अडकलो असून आज तुम्हाला भारतात परत घेऊन जाऊ,उद्या घेऊन जाऊ अशी उत्तरे भारतीय दूतावासाकडून दिली जात आहे.गेल्या शनिवारी तर आम्हाला भारतात घेऊन जाण्यासाठी विमान निघाले खरे,मात्र तीन तास आकाशात घिरट्या मारल्या नंतर परत येथे विमान उतरले.मात्र विदेश मंत्रालय व वॉचडॉग फाउंडेशनच्या प्रयत्नाने आम्ही आज सुखरूप आपल्या देशात परतलो अशी माहिती प्रवासी लिऑन किणी यांनी दिल्याचे  पिमेटा यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: 13 Indian citizen trapped in Holland finally returned safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.