CoronaVaccine: राज्यात २ लाख ३७ हजार ७०० लाभार्थींना लस; आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 06:24 AM2021-04-30T06:24:22+5:302021-04-30T06:25:14+5:30

आरोग्य विभागाची माहिती; ६,१६,७०३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस

CoronaVaccine: Vaccinated 2 lakh 37 thousand 700 beneficiaries in the state; Health department information | CoronaVaccine: राज्यात २ लाख ३७ हजार ७०० लाभार्थींना लस; आरोग्य विभागाची माहिती

CoronaVaccine: राज्यात २ लाख ३७ हजार ७०० लाभार्थींना लस; आरोग्य विभागाची माहिती

Next

मुंबई : राज्यात बुधवारी २ लाख ३७ हजार ७०० लाभार्थींना लस देण्यात आली आहे, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ५५ लाख ९४ हजार ६४० लाभार्थींचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ११ लाख २ हजार ३८२ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ६ लाख १६ हजार ७०३ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस, १२ लाख ८८ हजार ३७४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना पहिला डोस, ४ लाख ६९ हजार ६४४ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ८० लाख ८ हजार ४२६ लाभार्थींना लसीचा पहिला डोस तर १३ लाख ९ हजार १११ लाभार्थींना दुसरा डोस देण्यात आला आहे. मुंबईत २४ लाख ४२ हजार १४१, पुण्यात २१ लाख ९७ हजार ८३६, ठाण्यात १२ लाख १९ हजार ७२०, नागपूरमध्ये ९ लाख ५१ हजार ८१६ आणि नाशिकमध्ये ७ लाख १७ हजार ९७९ लाभार्थींना आतापर्यंत लस देण्यात आली आहे.

Web Title: CoronaVaccine: Vaccinated 2 lakh 37 thousand 700 beneficiaries in the state; Health department information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.