राज्यात १४ जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’, जाणून घ्या तुमचा जिल्हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 12:48 AM2020-04-17T00:48:46+5:302020-04-17T00:49:31+5:30

संसर्गाचे प्रमाण व वेग यानुसार केले वर्गीकरण

Corona's 'hotspot' in 3 districts in the state | राज्यात १४ जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’, जाणून घ्या तुमचा जिल्हा?

राज्यात १४ जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’, जाणून घ्या तुमचा जिल्हा?

googlenewsNext

मुंबई : मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलढाणा, नाशिक, कोल्हापूर, अमरावती आणि पालघर हे महाराष्ट्रातील १४ जिल्हे कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केले आहे.

यापैकी कोल्हापूर, अमरावती व पालघर हे ‘क्लस्टर हॉटस्पॉट’ आहेत तर इतर जिल्हे ‘क्लस्टर नसलेले हॉटस्पॉट’ आहेत. देशातील एकूण ७७६ पैकी १७० जिल्हे ‘हॉटस्पॉट’ आहेत. हे १७० हॉटस्पॉच जिल्हे २० राज्यांमध्ये आहेत. त्यात राज्यातील वरील जिल्ह्यांचा समावेश आहे.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना मृत्यू व संसर्गाचे प्रमाण राज्याच्या एकूण संख्येच्या ८० टक्के असेल किंवा जेथे चार दिवसांहून कमी काळात संसर्गाचे प्रमाण दुप्पट झाले असेल त्यांना ‘हॉटस्पॉट’ जिल्हे म्हटले जाते. एखाद्या ठराविक वस्तीत बऱ्याच लोकांना संसर्र्ग झालेला असेल तर त्याला ‘क्लस्टर’ म्हटले जाते.
कोरोना साथीचा दीड महिन्याचा आढावा घेऊन देशातील सर्व जिल्ह्यांचे ‘हॉटस्पॉट’, लोकांना संसर्ग होऊनही ‘हॉटस्पॉट’ वर्गात न मोडणारे व जेथे एकही
‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला नाही असे अशा तीन वर्गांत वर्गीकरण करण्यात आले आहे. नकाशावर ठळकपणे दाखविण्यासाठी या वर्गवारीला ‘रेड झोन, ‘आॅरेंज झोन’ व ‘ग्रीन झोन’ अशीही नावे देण्यात आली आहेत. प्रत्येक सोमवारी किंवा गरज पडल्यास त्याआधीही या वर्गवारीचा फेरआढावा घ्यावा, असे केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सूदान यांनी राज्यांना पत्र पाठवून कळविले आहे.

असा बदलत जाईल आॅरेंज ते ग्रीन झोन
हे वर्गीकरण कायमस्वरूपी नाही व बदलत्या परिस्थितीनुसार ते बदलत जाईल. सध्या ‘रेड झोन’ (हॉटस्पॉट) मध्ये असलेल्या जिल्ह्यात संसर्गाला आळा घालण्याचे परिणामकारक उपाय योजल्यानंतर १४ दिवसांत एकही नवा संसर्ग आढळला नाही तर तो ‘आॅरेंज झोन’मध्ये जाईल. २८ दिवसांनंतरही एकही नवा संसर्ग आढळला नाही तर ‘आॅरेंज झोन’ मधून तो जिल्हा ‘ग्रीन झोन’मध्ये जाईल.ं

हे आहेत कोरोनाच्या दृष्टीने धोकादायक जिल्हे
१ : मुंबई, २ : मुंबई उपनगर, ३ : ठाणे, ४ : पुणे, ५ : नाशिक, ६ : नागपूर,
७ : सांगली, ८ : अहमदनगर, ९ : यवतमाळ, १० : औरंगाबाद, ११ : बुलडाणा
 

Web Title: Corona's 'hotspot' in 3 districts in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.