Coronanews: 2940 new patients in a single day in the state, a total of 44,582 coronary diseases MMG | Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२

Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात २९४० रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ४४,५८२ वर पोहोचला आहे. त्यासोबतच, आज ८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १२,५८३ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण ३०,४७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रुग्णांची संख्या वाढतच आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज्यातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवाडी जाहीर केली आहे. राज्यात आज तब्बल २९४० रुग्ण वाढले असून एकाच दिवसातील रुग्णवाढीचा हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. 


दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात शुक्रवारी 2250 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. आज रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: Coronanews: 2940 new patients in a single day in the state, a total of 44,582 coronary diseases MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.