Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 22:12 IST2020-05-22T22:11:53+5:302020-05-22T22:12:03+5:30
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे

Coronanews: राज्यात एकाच दिवसात तब्बल २९४० नवे रुग्ण, एकूण कोरोनाबाधित ४४,५८२
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात आज दिवसभरात २९४० रुग्णांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ४४,५८२ वर पोहोचला आहे. त्यासोबतच, आज ८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १२,५८३ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. तर आता राज्यात एकूण ३०,४७४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या लाखाच्या पुढे गेली असून महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आज ४५ हजारांच्या जवळ पोहोचला आहे. राजधानी असलेल्या मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रुग्णांची संख्या वाढतच आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज्यातील आजची कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवाडी जाहीर केली आहे. राज्यात आज तब्बल २९४० रुग्ण वाढले असून एकाच दिवसातील रुग्णवाढीचा हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे.
राज्यात आज 2940 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 44582अशी झाली आहे. आज नवीन 857 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 12583 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 30474 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.#CoronaVirusUpdates#MeechMazaRakshak
— Rajesh Tope (@rajeshtope11) May 22, 2020
दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. राज्यात शुक्रवारी 2250 नवे कोरोनाबाधित आढळून आले होते. आज रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.