Join us

corona virus : मोदींच्या आवाहनाला देशभरात प्रतिसाद, वंदे मातरमचा जयघोष अन् 'घंटा'नाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 17:38 IST

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. नियमित जनता कर्फ्युनंतर लोकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकून भारत माता की जय च्या घोषणा दिला.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरात नागरिकांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यु पाळला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्यास, नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यानंतर, मोदींच्या आवाहनानुसार देशातील कोरोना संकटाच्या काळात आपलं योगदान देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सायंकाळी ५ वाजता नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटनाद करत देशातील डॉक्टर्स आणि पोलिसांप्रति आदर व्यक्त केला. तसेच, वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी आसमंत दुमून गेला. 

रविवारी जनतेने स्वयंस्फूर्ती बंद पाळून कोरोना या संकटाला आम्ही पळवून लावणारच, असे दाखवून दिले. नियमित जनता कर्फ्युनंतर लोकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटानाद करुन, शंख फुकून भारत माता की जय च्या घोषणा दिला. देशातील वातावरण या ५ मिनिटांसाठी स्फुर्तीमय बनले होते.  कोरोना विषाणूचा अत्यंत झपाट्याने फैलाव होताना दिसत आहे. कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिवसभर जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी देशवासीयांना रविवारी म्हणजे 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्यास सांगितलंय. कोरोनाच्या तिसऱ्या व अतिशय संवेदनशील टप्प्यावर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रत्येकाने प्रतिसाद दिल्याचे आज पाहायला मिळाले. 

दरम्यान, ‘लोकमत’नेही मोदी सरकारच्या या प्रयत्नांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे म्हटले होतेड. लोकांनी स्वत:हून संचारबंदीत सहभागी व्हावे. सरकार, प्रशासन व पोलिसांना पूर्ण सहकार्य करावे. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, दूधवाला, कचरावेचक, सकाळी रोज घराघरांत जाऊन पेपर टाकणारे हे सारे आपल्यासाठी झटत आहेत. पाच मिनिटांचा वेळ काढून थाळी नाद, घंटानाद, शंखनाद करून ही महत्त्वाची भूमिका बजावू या. अशा व्यक्तींच्या कामगिरीला सलाम करायला हवा. कोरोनाविरुद्धच्या युद्धात प्रत्येकाने सैनिकाप्रमाणे लढू या आणि पाच मिनिटांचा वेळ काढू या, असे आवाहन लोकमते केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या आवाहनाला देशातील नागरिकांनी उंदड प्रतिसाद दिला. तर, गाव-खेड्यातील नागरिकांपासून ते देशाच्या राजधानीपर्यंत सर्वांनीच आपलं पद, प्रतिष्ठा विसरुन कोरोना संकाटाचा मुकाबला करणाऱ्या लढवय्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.  

टॅग्स :नरेंद्र मोदीकोरोना वायरस बातम्यामुंबईडॉक्टरपोलिस