Corona virus : मोठा आधार... रेशन दुकानांतून 2 महिन्यांचे धान्य ऍडव्हान्समध्ये मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 19:23 IST2020-03-19T19:18:09+5:302020-03-19T19:23:14+5:30
Corona virus : स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे, जुनचे धान्य उपलब्ध

Corona virus : मोठा आधार... रेशन दुकानांतून 2 महिन्यांचे धान्य ऍडव्हान्समध्ये मिळणार
मुंबई - राज्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी करण्यात येते.
अंत्योदय अन्न योजनेखालील राज्यात 24 लाख 7 हजार 462 कुटुंबांना प्रतिमाह प्रतीशिधापत्रिका 35 किलो धान्य आणि प्राधान्य कुटुंबातील 5 कोटी 48 लाख 60 हजार 331 व्यक्तींना प्रतीव्यक्ती प्रतिमाह 5 किलो याप्रमाणात धान्य देण्यात येते. रु. 3/- प्रतीकिलो दराने तांदूळ आणि रु. 2/- प्रतिकिलो या दराने गहू उपलब्ध करुन देण्यात येते.
राज्यात कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी शासन सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या पार्श्वभुमीवर नागरिकांची सोय व्हावी म्हणून स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे व जून महिन्याचे धान्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #LetsFightCoronaTogether
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) March 19, 2020
स्वस्त धान्य दुकानात एप्रिल महिन्याच्या सोबतच मे व जून महिन्याचे धान्यही वाटप करण्यास सुरुवात केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रास्तभाव दुकानातून शिधावस्तूचे वितरण करताना लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदारांनी स्वत:चे आधार अधिप्रमाणीत करुन धान्यवाटपाची सुविधा ई-पॉस उपकरणावर उपलब्ध करण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना ई-पॉस उपकरणावर बोट/अंगठा लावण्याची आवश्यकता राहणार नाही.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. तसेच, नागरिकांनी गर्दी टाळण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णयही सरकारकडून घेण्यात येत आहेत.