Corona Vaccine:...तर लसीकरण केंद्रे होतील कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स; माजी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 18:48 IST2021-05-01T18:32:00+5:302021-05-01T18:48:43+5:30
लसीकरण व कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री सतत आवाहन करत आहे.पण मार्केट गर्दी मधील आणि भाजीवाल्यांची गर्दी पाहिल्यावर नागरिक स्वतःहून कोरोनाच्या स्वाधीन होत आहे

Corona Vaccine:...तर लसीकरण केंद्रे होतील कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स; माजी आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली भीती
मनोहर कुंभेजकर
मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून वाचवण्यासाठी लसीकरणाचे शिवधनुष्य उचलले हे अभिनंदनीय व स्वागतार्ह आहे.
लसीकरण व कोरोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री सतत आवाहन करत आहे.पण मार्केट गर्दी मधील आणि भाजीवाल्यांची गर्दी पाहिल्यावर नागरिक स्वतःहून कोरोनाच्या स्वाधीन होत आहे. लसीकरण व्हावे म्हणून नागरिक पहाटे पासून तासंनतास उभे राहून एकमेकांच्या संपर्कात येऊन व सोशल डिस्टनसिंग न पाळता लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी करत आहे.त्यामुळे लसीकरण केंद्रे कोरोनाचे सुपर स्प्रेडेर्स होत असल्याने लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी केली पाहिजे असे मत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतकडे व्यक्त केले.
मर्यादित लसींचा साठा, मर्यादित स्टाफ,लस घेतल्या नंतर पुन्हा अर्धा तास लसीकरण केंद्रात थांबवणे या सगळ्या गोष्टींतून कोरोनाचा किती संसर्ग होईल याची कल्पना लसीकरणासाठी जाणाऱ्या प्रत्येकाने करावी असे मत त्यांनी व्यक्त केले. वयोगट 18 ते 44 यांचे 44 ते 35 वर्षे,35 वर्षे ते 25 वर्षे व 25 ते 18 वर्षे केल्यास राज्यातील 6 कोटी 74 लाख या गटातील नागरिकांना टप्याटप्याने लस मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात दिवसाला 1 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यास लस उपलब्ध झाल्यास कोरोनाचा वाढणारा संसर्ग मर्यादित राहू शकेल असे डॉ.दीपक सावंत म्हणाले.
अजून 65 वर्षांवरील निम्म्या नागरिकांचे लसीकरण बाकी आहे.तसेच यापैकी लस उपलब्ध झाल्यास फॅमिली फिजिशियन मार्फत दुपारच्या वेळात लसीकरण होऊ शकेल, त्यासाठी एसओपी तयार करणे गरजेचे आहे अशी सूचना डॉ.सावंत यांनी केली.तसेच कोविन अँपवर एकाच वेळी होणारी नोंदणीला होणारी झुंबड उडत असल्याने कोविन अँप क्रॅश होत आहे.म्हणून राज्याने पर्यायी अँप निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावा. आणि लसीकरण केंद्र ही कोरोनाची संसर्ग केंद्र होणार नाही,निदान आपण व्यवस्थित दिलेक्या वेळेनुसार काळजी घेऊन येथील गर्दी कमी करावी असे आवाहन त्यांनी केले.