corona vaccination : मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर कोरोना लस 'आऊट ऑफ स्टॉक', राज्यातील अनेक भागातही तशीच परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 02:02 PM2021-04-08T14:02:30+5:302021-04-08T14:02:45+5:30

corona vaccination in Mumbai : महाराष्ट्रामध्ये कोरोनाविरोधातील लसींची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाल्याने सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर कोरोनाची लस आऊट ऑफ स्टॉक झाली आहेत.

corona vaccination: Corona vaccine out of stock at many vaccination centers in Mumbai, same situation in many parts of the state | corona vaccination : मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर कोरोना लस 'आऊट ऑफ स्टॉक', राज्यातील अनेक भागातही तशीच परिस्थिती

corona vaccination : मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रावर कोरोना लस 'आऊट ऑफ स्टॉक', राज्यातील अनेक भागातही तशीच परिस्थिती

googlenewsNext

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातील लसीकरणाचा वेग वाढणे गरजेचे आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये कोरोनाविरोधातील लसींची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाल्याने सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर कोरोनाची लस आऊट ऑफ स्टॉक झाली आहेत (corona vaccination in Mumbai). राज्यातील अनेक भागांमध्येही कोरोनाची लस संपली आहे. तर काही ठिकाणी लसीचा साठा पुढच्या एक दोन दिवसांत संपण्याची शक्यता आहे. (Corona vaccine out of stock at many vaccination centers in Mumbai, same situation in many parts of the state)

मुंबईतील माहीम भागात कोरोनावरील लस संपल्याचे बोर्ड लसीकरण केंद्राबाहेर लावण्यात आले आहेत. मुंबईमध्ये सध्या कोरोनाची १२० लसीकरण केंद्रे आहेत त्यापैकी ७३ केंद्रे खासगी आहेत. त्यापैकी २६ केंद्रे आताच बंद झाली आहेत. तर उद्या २२ केंद्रे बंद होण्याची शक्यता आहे. 

याशिवाय जर लसीचा पुरवठा वेळीच पूर्ववत झाला नाही तर मुंबईतील २५ खासगी लसीकरण केंद्रे १ एप्रिल रोजी बंद होऊ शकतात. मुंबई महानगरपालिकेची सरकारी लसीकरण केंद्रेसुद्धा लसीच्या टंचाईचा सामना करत आहेत. लसीचा पुरवठा वेळीच सुरू झाला नाही तक ही केंद्रेसुद्धा शनिवारी बंद होऊ शकतात.  
 
मुंबईबरोबरच सांगली सातारा, गोंदिया, पनवेल, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही कोरोना लसींचा साठा संपुष्टात आला आहे. तर यवतमाळ, कोल्हापूर, नवी मुंबई आणि वाशिम जिल्ह्यात कोरोना लसींचा साठा उद्यापर्यंत संपुष्टात येऊ शकतो.  

Web Title: corona vaccination: Corona vaccine out of stock at many vaccination centers in Mumbai, same situation in many parts of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.