Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 15:50 IST2021-06-24T15:49:38+5:302021-06-24T15:50:35+5:30
Corona Vaccination : कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील लसीकरण घोटाळ्यात गुप्ता व सिंग यांची नावे आहेत. जे सध्या कांदिवली पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Corona Vaccination : आदित्य कॉलेज बोगस लसीकरण; एफआयआर दाखल
मुंबई: आदित्य कॉलेजमधील २१३ जणांच्या बोगस लसीकरण प्रकरणी बुधवारी बोरिवली पोलिसांनी चौथा दखलपात्र गुन्हा दाखल केला. यात कोकिलाबेन रुग्णालयाचा माजी कर्मचारी राजेश पांडे, शिबिर आयोजक संजय गुप्ता आणि मास्टरमाइंड महेंद्र सिंग याच्यासह अजून पाच जणांची नावे आहेत. ज्यात एका महिलेचाही समावेश आहे.
कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीतील लसीकरण घोटाळ्यात गुप्ता व सिंग यांची नावे आहेत. जे सध्या कांदिवली पोलिसांच्या ताब्यात आहेत. आदित्य कॉलेजमध्ये ३ जून, २०२१ रोजी हे बोगस लसीकरण शिबिर आयोजित केले होते. पांडे हा नामांकित रुग्णालयातील माजी कर्मचारी असल्याने त्याच्यावर कॉलेज व्यवस्थापनाचा विश्वास होता.
त्यामुळे त्यांनी लसीकरणाला परवानगी दिली, असे कॉलेज व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले. या टोळीने एकूण ९ ठिकाणी असे कॅम्प केले असून अद्याप चार उघडकीस आले आहे. त्यानुसार अजून पाच ठिकाणी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.