मासे खरेदी करणाऱ्यांमुळे बळावला कोरोना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 12:56 AM2020-06-13T00:56:48+5:302020-06-13T00:57:13+5:30

जाणकारांनी व्यक्त केली चिंता : ‘मढ’मध्ये चार दिवस लॉकडाऊन; मजूरही कारणीभूत

Corona revolted by fish buyers? | मासे खरेदी करणाऱ्यांमुळे बळावला कोरोना ?

मासे खरेदी करणाऱ्यांमुळे बळावला कोरोना ?

Next

गौरी टेंबकर - कलगुटकर ।

मुंबई : पालिकेच्या पी उत्तर विभागात पुढचे चार दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. ज्यात मढचाही समावेश आहे. सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे मालाडमधील अन्य परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याचा अंदाज पालिकेकडून व्यक्त करण्यात येत असला तरी मढमध्ये मात्र मासे खरेदीसाठी बाहेरून येणारे ग्राहक तसेच स्वत:च्या गावी परतण्यासाठी झालेली मजुरांची गर्दी हा आजार बळावण्यासाठी कारणीभूत असल्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मालाडच्या पी उत्तर विभागात पूर्वेला कोकणीपाडा, तानाजीनगर, शिवाजीनगर, क्रांतीनगर, आप्पापाडा, पिंपरीपाडा तर पश्चिमेत मोडणाºया मढ, एमएचबी कॉलनी, राठोडी या ठिकाणी गुरुवारी रात्री पालिकेकडून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यातील बºयाच परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृहे विषाणूचे संक्रमण वाढण्यास कारणीभूत ठरल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाचे म्हणणे आहे. मात्र मढ परिसरात जवळपास ९५ टक्के घरांत स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे त्यातून आजार पसरण्याची शक्यता कमी आहे. तसेच लॉकडाऊनदरम्यान धान्य तसेच तयार जेवणाचे वाटप सुरू असतानादेखील या परिसरात कोरोनाबधितांची संख्या नियंत्रणात होती. त्यामुळे कोरोना बळावण्यामागे मासे खरेदीसाठी बाहेरून येणारे ग्राहक कारणीभूत असल्याचे स्थानिक कोळ्यांचे मत आहे.
लॉकडाऊन दरम्यान या ठिकाणची स्थिती बºयापैकी नियंत्रणात ठेवण्यास सहायक पालिका आयुक्त संजोग कबरे यांना यश मिळाले होते. मात्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आला आणि मढ कोळीवाडा तसेच भाटी गावात मासे खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमू लागली. मालाड आणि कुलाबा मार्केट सध्या बंद असल्याने लांबच्या ठिकाणांहून लोक गाड्या घेऊन या ठिकाणी येऊ लागले. त्यातून जर एखादी व्यक्ती लक्षणे नसलेली असेल तर नकळत निरोगी व्यक्तीला त्याचा प्रादुर्भाव झाल्याची शक्यता आहे.
मासे पिशवीत भरणे, त्याची किंमत रोख रकमेच्या स्वरूपात देणे-घेणे तसेच भाव करण्यासाठी होणारी गर्दी यातून कोरोना विषाणू मढ परिसरात पसरल्याची भीती स्थनिकांकडून व्यक्त केली जात आहे.
त्याचसोबत परप्रांतीय मजूरदेखील गावी जाण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने रांगा लावून उभे होते. त्यांना पाण्याच्या बाटल्या आणि अन्य सोय करण्यात कोळीवाड्यातील लोक सहभागी झाले होते. त्यादरम्यानही ही लागण झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

आजार लपविण्याचा होतोय प्रयत्न?
‘कोळीवाडा परिसरात कोरोनासदृश्य लक्षणे दिसल्यास रुग्णालयात दाखल होण्याच्या भीतीने ती लपविण्याचा प्रयत्नदेखील झाल्याची शक्यता आहे. स्वत:हून औषधोपचार करणे किंवा स्थानिक डॉक्टरकडे जाऊन तात्पुरती औषधे घेऊन आजार लपविण्याचा प्रयत्न करण्यामुळे आजार वाढल्याची शक्यता असून या अनुषंगाने चौकशी करण्याचीही गरज आता निर्माण झाली आहे.

Web Title: Corona revolted by fish buyers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई