मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ८० टक्क्यांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 04:42 AM2020-08-17T04:42:44+5:302020-08-17T04:43:05+5:30

तर आतापर्यंत १ लाख ३ हजार ४६८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. १७ हजार ८२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा दर ८५ दिवस झाला आहे.

Corona patients recover in Mumbai at 80 per cent | मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ८० टक्क्यांवर

मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ८० टक्क्यांवर

Next

मुंबई : मुंबईत बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा दर ८० टक्क्यांवर गेला आहे. तर आतापर्यंत १ लाख ३ हजार ४६८ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. १७ हजार ८२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण दुपटीचा दर ८५ दिवस झाला आहे.
९ ते १५ आॅगस्ट दरम्यान मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत मुंबईत कोविडच्या ६ लाख ५१ हजार ५९३ चाचण्या झाल्या आहेत. सध्या शहर-उपनगरात झोपडपट्ट्या चाळींमध्ये ५७० सक्रिय कंटेनमेंट झोन्स आहेत, तर ५ हजार ६३१ सक्रिय सीलबंद इमारती आहेत. मुंबईत रविवारी १ हजार १० रुग्णांचे निदान झाले असून ४७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ लाख २८ हजार ७२६ झाली असून मृतांची संख्या ७ हजार १३३ झाली आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ३१ लाख ६२ हजार ७४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८.८४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Web Title: Corona patients recover in Mumbai at 80 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.