Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकिकडे कोरोना तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पाऊस; महाराष्ट्र बेजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 15:58 IST

कमाल तापमान ४० अंशावर नोंदविण्यात येत असून, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.

 

मुंबई : एकिकडे कोरोना तर दुसरीकडे उष्णतेच्या लाटा आणि अवकाळी पावसाने महाराष्ट्र बेजार झाला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान ४० अंशावर नोंदविण्यात येत असून, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. एकंदर महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट कोसळले असतानाच दुसरीकडे उष्णतेच्या लाटासह अवकाळी पावसाने महाराष्ट्र बेजार झाला आहे.हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी पुणे, सांगली, अहमदनगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्हयात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. दुसरीकडे विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमानाने कहर केला आहे. तापमान ४० अंशावर दाखल झाले आहे. संपुर्ण महाराष्ट्राचे कमाल तापमान ४० अंशावर दाखल झाले असून, नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. नंदुरबार, मालेगाव, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर या जिल्यांत कमाल तापमानाने चांगलीच उसळी घेतली आहे.----------------------तो येतोय...मान्सून २० मे च्या आसपास अंदमानात दाखल होतो. त्यानंतर ५ दिवसांनी आणखी पुढे येत तो २५ मे रोजी श्रीलंकेत दाखल होतो. तर १ जून रोजी मान्सून केरळात दाखल होतो, अशी माहिती स्कायमेटकडून देण्यात आली.

टॅग्स :उष्माघातकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्र