Corona infection in seven-month-old baby in Mumbai | Coronavirus: मुंबईतील सात महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

Coronavirus: मुंबईतील सात महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

मुंबई : मुंबईसारख्या मेट्रो शहरांत आता कोरोनाचा फैलाव वेगाने होतोय. यातील ९० टक्के फैलाव हा स्थानिक संसगार्तून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संचारबंदीनंतरही रस्त्यांवर फिरणाऱ्या मुंबईकरांनी वेळीच हा धोका ओळखून दक्षता पाळायला हवी.

मुंबई शहर उपनगरात शनिवारी सात महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हा संसर्ग निकट संपर्कातून झाल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे शनिवारी एकूण २२ कोरोना रुग्णांचे निदान झाले त्यातील १५ मुंबईतील तर सात मुंबईबाहेरील आहेत.

Web Title: Corona infection in seven-month-old baby in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.