कोरोनाचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या तिजोरीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:38 PM2020-04-12T17:38:48+5:302020-04-12T17:39:32+5:30

१ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत ३७० कोटीचे नुकसान

Corona impact on Western Railway reserve | कोरोनाचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या तिजोरीवर

कोरोनाचा परिणाम पश्चिम रेल्वेच्या तिजोरीवर

Next

 

मुंबई : कोरोना विषाणूमुळे सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा बंद आहे. परिणामी पश्चिम रेल्वेच्या तिजोरीवर फटका बसत आहे. १ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत सुमारे ३७० कोटीचे नुकसान पश्चिम रेल्वेला सोसावे लागले आहे.

कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी 22 मार्चपासून लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा बंद झाली. परिणामी, पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या  प्रवासी वाहतुकीतून मिळणारे आणि इतर माध्यमातून मिळणारा महसूल सुद्धा बुडत आहे. 22 मार्च या एका दिवशी 79 कोटी रुपयांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यानंतर 24 मार्च पर्यंत 107 कोटी,  26 मार्च पर्यंत 135 कोटी 66 लाख रुपये, 28 मार्च पर्यंत  163 कोटी  रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. तर, 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत 207 कोटी 11 लाखांचा फटका बसला आहे, तर, १ ते ११ एप्रिल या कालावधीत १६१ कोटी ९२ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे मंत्रालयाने मुंबईची उपनगरीय लोकल, देशातील लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, कोलकता मेट्रो 31 मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनामुळे 21 दिवस लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. परिणामी, 14 एप्रिलपर्यंत लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याही बंद राहणार होत्या. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १४ एप्रिलनंतरही लोकल सेवा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेला याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

प्रवाशाच्या तिकीट दरासह इतर अनेक बाबीतून पश्चिम रेल्वेला उत्पन्न मिळते. मात्र हे उत्पन्न आता मिळणे बंद झाले आहे. विनातिकीट प्रवासी, जाहिरात मधून पश्चिम रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र आता हे उत्पन्न बुडत असल्याची आहे. यासह पश्चिम रेल्वे प्रशासनाच्यावतीने प्रवाशांना रद्द झालेल्या प्रवाशाचा परतावा देणे सुरु आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: Corona impact on Western Railway reserve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.