Corona Effect : प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले, काेराेनाचा फटका; दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 05:53 AM2021-04-14T05:53:12+5:302021-04-14T05:53:47+5:30

Corona Effect : मुंबई अंतर्गत प्रवासासाठी माेठ्या प्रमाणावर रिक्षा व टॅक्सी सेवाचा वापर केला जाताे. मात्र काेराेना प्रतिबंधात्मक नियमांमुळे खासगी कंपन्यांतील अनेकांचे ‘वर्क फ्राॅम हाेम‘ सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे.

Corona Effect: Restrictive restrictions slow down the wheel of the rickshaw, hitting the corona; Less than 5 lakh rounds per day | Corona Effect : प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले, काेराेनाचा फटका; दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी

Corona Effect : प्रतिबंंधात्मक निर्बंधांमुळे रिक्षाचे चाक मंदावले, काेराेनाचा फटका; दरराेजच्या ५ लाख फेऱ्या कमी

googlenewsNext

मुंबई : कोरोनाच्या निर्बंधांमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या फेऱ्यांत मोठी घट झाली आहे. रिक्षाच्या दररोजच्या ४ ते ५ लाख फेऱ्या, तर टॅक्सीच्या ५० हजार फेऱ्या कमी झाल्या आहेत. मुंबईत रिक्षाच्या दररोज १५ लाख, तर टॅक्सीच्या एक लाख फेऱ्या होतात.
मुंबई अंतर्गत प्रवासासाठी माेठ्या प्रमाणावर रिक्षा व टॅक्सी सेवाचा वापर केला जाताे. मात्र काेराेना प्रतिबंधात्मक नियमांमुळे खासगी कंपन्यांतील अनेकांचे ‘वर्क फ्राॅम हाेम‘ सुरू आहे. त्यामुळे प्रवासी संख्या कमी झाली आहे. ऑटो रिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव म्हणाले की, गेल्या एका आठवड्यात, आम्ही रिक्षाच्या फेऱ्यांमध्ये मोठी घट पाहिली आहे. कारण केवळ दोन प्रवाशांना रिक्षातून प्रवासास परवानगी आहे. लोक खासगी कार्यालयात जाण्यासाठी किंवा खरेदीसाठीही बाहेर पडणे टाळत आहेत. त्यामुळे अनेक मार्गांवरही रिक्षा रिकाम्या धावत आहेत. 
तर, मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे नेते ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले की, सध्या कमी अंतराच्या प्रवासासाठी प्रवासी ऑटो किंवा टॅक्सीतून प्रवास करणे टाळत आहेत. काेराेनाच्या वाढत्या संसर्गासाेबतच नुकतीच भाड्यात तीन रुपयांनी झालेली वाढ हेही प्रवासी कमी हाेण्यामागील एक कारण आहे.
दुसरीकडे निर्बंध अधिक कडक हाेण्याच्या भीतीने वाहनचालकांचा एक गट आपल्या गावी परत जाण्याचा विचार करीत आहे. कोरोनापूर्वीच्या वेळेच्या तुलनेत कमाई कमी झाली आहे. याशिवाय, गेल्या लॉकडाऊनदरम्यान मोठे नुकसान झाले. पुन्हा नुकसान हाेण्याची भीती आहे, अशी खंत एका रिक्षा चालकाने व्यक्त केली.

एसटी कर्मचाऱ्यांचा आकडा सहा हजार पार
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. एसटीतील कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांचा आकडाही सहा हजारांहून अधिक झाला आहे.
एसटीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कोरोना काळात सेवा देताना राज्यातील एकूण ५,२३८ एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, तर ११८ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ४५१७ कर्मचारी उपचार घेऊन कामावर आले. तर ६०३ एसटी कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहे. दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले नाही, त्यांची यामध्ये नोंद नसून हा आकडा सहा हजारांहून अधिक झाला आहे.

निर्णयाचा फेरविचार व्हावा
काेराेना काळात एसटीच्या चालक, वाहकांच्या सुरक्षिततेची काळजी प्रशासनाकडून गाभीर्याने घेतली जात नाही. बेस्ट कामगिरी करून आपल्या गावी गेलेले कर्मचारी काेराेना पाॅझिटिव्ह येत आहेत. मुंबईवरून कामगिरी करून गेलेल्या पाथरी आगाराच्या चाैघांना काेराेना झाला. बेस्ट सेवेसाठी एसटी कर्मचारी पाठवण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस
 

Web Title: Corona Effect: Restrictive restrictions slow down the wheel of the rickshaw, hitting the corona; Less than 5 lakh rounds per day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.