कोरोना कोरोना , हमसे डरोना म्हणत आयुषच्या गेममधून कोरोनाचा खात्मा ...! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 05:37 PM2020-05-23T17:37:23+5:302020-05-23T17:38:27+5:30

९ वर्षाच्या आयुषने कोडींगच्या छंदातून केली गेमची निर्मिती 

Corona Corona, Humse Drona saying Corona's elimination from AYUSH's game ...! | कोरोना कोरोना , हमसे डरोना म्हणत आयुषच्या गेममधून कोरोनाचा खात्मा ...! 

कोरोना कोरोना , हमसे डरोना म्हणत आयुषच्या गेममधून कोरोनाचा खात्मा ...! 

Next

सीमा महांगडे  

मुंबई : कोरोना , कोरोना हमसे डरोना म्हणत ९ वर्षांच्या आयुषने  गेममधील योद्धा आधी अंधाऱ्या भागातून दिलेल्या वेळेत व्हायरसला शोधून काढतो आणि दुसऱ्या भागात हँड सॅनिटायझरच्या अवतारमध्ये असलेला योद्धा व्हायरसला शूट करून त्या व्हायरसचा हल्ला परतवत असतो. यामध्ये कोविड -१९ ला आपण स्वच्छता बाळगून आणि मास्क , सॅनिटायझर यांच्या सहाय्याने कसे हरवू शकतो हे गेमरूपात आयुषने मांडून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. या गेमचे कोडिंग बनवून व तो गेम रूपात आणून  फाईट अगेन्स्ट कोरोना ही आय -रोबोकीडची स्पर्धा जिंकण्याचा मान ही मिळविला आहे. 

मुंबईच्या मालाड येथील बिलाबॉंग हाय इंटरनॅशनल स्कुलमध्ये ५ वी इयत्तेत शिकणाऱ्या आयुष संकरण याला कोडींगची आवड आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात आपल्या छंदाचा आपल्याला लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी , आपल्याच वयाच्या मुलांना , मित्रांना कोरोना सोबत लढण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे सांगण्यासाठी कसा उपयोग होईल याचा विचार मनात आला.  एरवी प्राण्याना आपण कोंडून ठेवतो आणि आतापण बाहेर फिरतो मात्र कोरोना काळात प्रत्येक जण घरात बंदिस्त आहे तर दुसरीकडे प्राणी बाहेर फिरत आहेत याचा विचार करून मी माझ्या गेममध्ये आधी व्हायरसला शोधायचे आणि मग त्यावर हल्ला करायचा अशा दोन स्टेज  निर्माण केल्याची माहिती तो देतो. तो आणखीही विविध ऍप्लिकेशन्सवर या काळात काम करत असून त्यांचे कोडिंग करण्यात व्यस्त असल्याचे तो सांगतो. या आधी ही त्याने एमआयटीचा इन्व्हेन्टर अवॉर्ड एक क्वीज गेम ऍप बनविण्यासाठी जिंकले आहे. 

सध्या लॉकडाउनच्या काळात जास्तीत जास्त मुले ही ऑनलाईन अभ्यास आणि त्यासोबत ऑनलाईन गेमिंगकडे वळली आहेत. अशात जर मुलांपर्यंत कोरोनासाठी काय काळजी घ्यायला हवी याची माहिती मुलांपयंत हसत खेळतच पोहचली तर जास्त उपयोग होईल असे मत आयुषची आई लक्ष्मी यांनी व्यक्त केले. तर माझ्या गेम कोडींगच्या आवडीचा उपयोग माझ्या मित्रांमध्ये माहिती पसरविण्यास होत असेल तर निश्चितच मला आवडेल अशी प्रतिक्रिया आयुषने दिली आहे. 

 

Web Title: Corona Corona, Humse Drona saying Corona's elimination from AYUSH's game ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app