Join us

मुंबईच्या BKC मधील जिओ कन्वेंशन सेंटरही बनणार 'कोरोना काळजी केंद्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 21:42 IST

अस्लम शेख व आदित्य ठाकरे या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल येथिल जिओ कन्वेंशन सेंटरची १५०० रुग्णांची सोय होऊ शकेल येवढी क्षमता आहे

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुल येथील जिओ कन्वेंशन सेंटरचे रुपांतर कोरोना काळजी केंद्रात होणार आहे. मुंबई शहरचे पालक मंत्री व राज्याचे मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री व राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज जिओ कन्वेशन सेंटरचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत बृहन्मुबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी देखिल उपस्थित होते.

अस्लम शेख व आदित्य ठाकरे या द्वयींनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला संकुल येथिल जिओ कन्वेंशन सेंटरची १५०० रुग्णांची सोय होऊ शकेल येवढी क्षमता आहे. लवकरच या जिओ कन्वेंशन सेंटरच रुपांतर सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशा कोरोना केअर सेंटर मध्ये होईल. अस्लम शेख  यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी  मुंबई उनगरचे जिल्हाधिकारी  मिलिंद बोरीकर , पोलिस उपायुक्त मंजुनाथ सिंगे पालिका उपायुक्त व अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत एक पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी जिओ कन्वेंशन सेंटरलाही भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान माध्यमांशी बोलताना कोविड - १९ रुग्णालयासाठी जिओ कन्वेंशन सेंटरचा विचार चालू असल्याची माहिती त्यांनी दिली होती. 

टॅग्स :आदित्य ठाकरेमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई