लोकमत न्यूज नेटवर्क मीरारोड - मीरा भाईंदर मेट्रो मार्गिके खालील जुना पेट्रोलपंप पासून आझाद नगर येथे उतरणाऱ्या उड्डाणपुलावरून इंजिनियर पेक्षा अतिविद्वान समजणारे काही कथितांनी समाज माध्यमांवर चालवलेल्या बोलघेवडेपणा मुळे गोंधळाचे वातावरण सुरु आहे. काही राजकारणी देखील सवंग प्रसिद्धीसाठी सरसावले असून दुसरीकडे इंजिनियर पेक्षा अतिविद्वान काही समाज माध्यमांवरील लोकांनी आपलेच आरोप खरे असा रेटा चालवला आहे.
मीरा भाईंदर शहरात मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. मुख्य रस्ता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर मेट्रो मार्गिके खाली ३ ठिकाणी उड्डाण पूल बांधले आहेत. त्यातील श्रीकांत जिचकार चौक आणि सिल्वर पार्क जंक्शन येथील दोन उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्वीच खुले झाले आहेत. तर जुना पेट्रोल पंप पासून सुरु होणारा व फाटक मार्गावरील आझाद नगर येथे उतरणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामावरून सध्या समाज माध्यमातून एमएमआरडीएची खिल्ली उडवली जात आहे.
जुना पेट्रोल पंप ते गोल्डन नेस्ट जंक्शन पर्यंत हा उड्डाणपूल दोन्ही बाजूने २ - २ पदरी आहे. मात्र, आझाद नगर सुरु होताच हा पूल दोन्ही बाजूने अचानक १ - १ पदरी झालेला आहे. त्यामुळे अपघात होण्याची भीती पासून एमएमआरडीए ने व महापालिकेने अश्या बिनडोकपणाचे नियोजन व काम कसे केले? असा सवाल करत लोकांच्या पैश्यांचा चुराडा केला, कायम स्वरूपी अपघाताचा धोका राहणार आदी टीका समाज माध्यमांवर काहींनी चालवली आहे.
एमएमआरडीएचे म्हणणे काय...
मात्र, ह्या अतिविद्वान समाज माध्यमी यांच्या निव्वळ सनसनाटी पसरवण्याच्या अर्धवट ज्ञानाला एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने खोडून काढत, हा उड्डाणपूल अचानक अरुंद होत नाही असे स्पष्ट केले आहे. मुख्य रस्ता हा विकास आराखड्या नुसार ४५ मीटर असून आझाद नगरचा रस्ता हा ३० मीटर आहे. त्यामुळे आझाद नगर - फाटक मार्गावर रस्ता कमी असल्याने केवळ १ - १ मार्गिकाच उतरवण्यात आली आहे. तर भाईंदर जुने फाटक बंद झाल्याने पूर्व - पश्चिम जोडणारा उड्डाणपूलची मागणी आणि गरज अनेक वर्षां पासून होत आहे. भविष्यात भाईंदर पश्चिमेस उड्डाणपूल नेण्याचे नियोजन असल्याने त्यासाठी १ - १ मार्गिकेचा पूल बनवला जाणार आहे. त्यामुळे गोल्डन नेस्ट जंक्शन वरील दोन - दोन मार्गिकेच्या पैकी एक - एक मार्गिका हि विस्तारित करून भाईंदर पश्चिम येथे नेली जाणार आहे.
गोल्डन नेस्ट जंक्शन येथे ५ रस्ते एकत्र होतात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचे जंक्शन आहे. याठिकाणी मेट्रो मार्गिका आणि मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण झाल्या नंतर येथे ४ पदरी पूल बांधणे शक्य होणार नाही. त्यामुळे भाईंदर पूर्वे वरून पश्चिमेला उड्डाणपुलाचे काम करायचे झाल्यास ह्या पुलाच्या पत्येकी १ - १ मार्गिका ह्या त्याला जोडल्या जाणार आहेत. शिवाय सध्याच्या घडीला २ पदरी वरून १ पदरी मार्गिका होते त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा खबरदारी म्हणून बेरकेटिंग केले गेले आहे.
तर दुसरीकडे जागरूक नागरिकांनी देखील समाज माध्यमांवर दिशाभूल चालवणाऱ्या लोकांची अर्धवट इंजिनियर पासून अकलेचे तारे तोडणारे अतिविद्वान अशी खिल्ली उडवली आहे. एखादा ४ किंवा २ पदरी रस्ता किंवा पूल हा शेवटपर्यंत २ पदरीच असो असे नसते. अनेक ठिकाणी तो कमी वा जास्त होत असतो. कुठे रस्ता कमी वा मोठा असतो म्हणजे तिकडे प्रत्येक ठिकाणी अपघातच होतात का? असा सवाल केला आहे. भाईंदर जुने फाटक बंद झाल्या नंतर लोकांना येथून वाहतुकीसाठी भुयारी मार्ग वा लहान एकपदरी उड्डाणपूल व्हावा अशी अनेक वर्षांपासून अपेक्षा आहे. मात्र सनसनाटी पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सोशल मीडिया वर काही अर्धवट इंजिनियर करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे.
Web Summary : Bhayandar's new flyover design sparks debate. MMRDA clarifies the lane reduction is due to road width differences and future expansion plans for connectivity to Bhayandar West, addressing safety concerns with barricades.
Web Summary : भाईंदर के नए फ्लाईओवर डिजाइन पर बहस। MMRDA ने स्पष्ट किया कि लेन में कमी सड़क की चौड़ाई के अंतर और भाईंदर पश्चिम से कनेक्टिविटी के लिए भविष्य की विस्तार योजनाओं के कारण है, सुरक्षा चिंताओं को बैरिकेड से दूर किया गया है।