साेसायटीत भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून वाद; दाम्पत्य, रहिवाशांची परस्पर विरोधी तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 08:54 AM2023-10-16T08:54:50+5:302023-10-16T08:54:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भटक्या श्वानांना जेवण देण्यावरून कांजूर मार्ग पश्चिमेच्या रुणवाल फॉरेस्ट सोसायटीत श्वानप्रेमी दाम्पत्यावर जमावाने हल्ला ...

Controversy over feeding stray dogs in society; Conflicting complaint of couple, resident | साेसायटीत भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून वाद; दाम्पत्य, रहिवाशांची परस्पर विरोधी तक्रार

साेसायटीत भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून वाद; दाम्पत्य, रहिवाशांची परस्पर विरोधी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भटक्या श्वानांना जेवण देण्यावरून कांजूर मार्ग पश्चिमेच्या रुणवाल फॉरेस्ट सोसायटीत श्वानप्रेमी दाम्पत्यावर जमावाने हल्ला चढविला. या प्रकरणी दाम्पत्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला, दरम्यान, सोसायटीच्या सचिवाची पत्नी निनिशा देवपुरा यांच्या तक्रारीवरून दिया आणि तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीत दिया आणि तिच्या पतीने हल्ला केल्याचा आरोप केला आहे.

साहा दाम्पत्य ९ ऑक्टोबर रोजी श्वानांना जेवण देण्यासाठी गेले. त्यावेळी ३० ते ४० जण हातात लाठीकाठी घेऊन आले. श्वानांना जेवण देण्यास सुरुवात करताच जमावाने चौकशी करत हल्ला चढवला आणि त्यांचा पाठलाग केला.

सोसायटीच्या आवारात श्वानांचा चावा
सोसायटीकडून होत असलेल्या आरोपात श्वान चावण्याच्या घटना वाढत आहेत. जवळपास शेकडो हल्ले झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.  ज्येष्ठ नागरिक श्वानांच्या भीतीने बाहेर पडत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.

जमावाची दहशत कायम
    गुन्हा दाखल झाल्यानंतरही १० ते १५ जणांच्या जमावाकडून घर खाली करण्यासाठी दबाव वाढला आहे. ते आजही हातात लाठीकाठी घेऊन फिरताना दिसतात.
    अशा मानसिकतेच्या लोकांमुळे कोणीही भटक्या प्राण्यांच्या मदतीसाठी पुढे येणार नाही. हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे, असे दिया सांगतात. 

Web Title: Controversy over feeding stray dogs in society; Conflicting complaint of couple, resident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.