Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर स्वच्छता मोहिमेतून परिसर स्वच्छतेला हातभार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 07:04 IST

एकाच वेळी तीन ते चार विभागांतील मनुष्यबळ हे परिसर स्वच्छतेसाठी एकवटल्याने मोहिमेला ठिकठिकाणी बळ मिळत असल्याचे ते म्हणाले. 

मुंबई : महापालिकेच्या डीप क्लिनिंग मोहमेअंतर्गत मंदिराच्या परिसरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. त्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कुर्ला परिसरात विविध ठिकाणी मंदिर स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी, कुर्ला (नेहरूनगर) शिवसृष्टी परिसरातील श्री गणेश मंदिर येथे स्वच्छता अभियानानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत ते बोलत होते. मंदिर स्वच्छतेमुळे संपूर्ण परिसर स्वच्छ होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.  एकाच वेळी तीन ते चार विभागांतील मनुष्यबळ हे परिसर स्वच्छतेसाठी एकवटल्याने मोहिमेला ठिकठिकाणी बळ मिळत असल्याचे ते म्हणाले. 

प्रत्येक वॉर्डातील ३ मंदिरांची स्वच्छता 

प्रत्येक प्रशासकीय विभागातील किमान तीन प्रमुख मंदिरांची २२ जानेवारीपर्यंत स्थानिक पातळीवर निवड केली जाणार आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील किमान तीन प्रमुख मंदिरांची स्थानिक पातळीवर निवड केली जाणार आहे. शिवाय स्वच्छतेनंतर मंदिरांची स्वच्छता आणि रोषणाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मुंबईतील मंदिर परिसर स्वच्छतेकामी सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

टॅग्स :एकनाथ शिंदेमंदिरमुंबई महानगरपालिका