मेट्रो-४ मार्गिकेवर गर्डर बसविण्याच्या कामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 06:17 IST2019-12-09T02:26:05+5:302019-12-09T06:17:42+5:30
वडाळा ते कासारवडावली या मेट्रो-४ मार्गिकेसाठी झाडे तोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध लावला आहे.

मेट्रो-४ मार्गिकेवर गर्डर बसविण्याच्या कामाला सुरुवात
मुंबई : वडाळा ते कासारवडावली या मेट्रो-४ मार्गिकेसाठी झाडे तोडण्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रतिबंध लावला आहे. असे असतानाही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) करण्यात येणाºया मेट्रो-४ मार्गिकेच्या कामाला गती आली आहे. प्राधिकरणाने शुक्रवारी या मार्गिकेवर पहिला यू गर्डर बसविला आहे.
मेट्रो-४ मार्गिकेदरम्यान ३२ मेट्रो स्थानके बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी एकूण १४ हजार ५४९ कोटी रुपये खर्च येणार आहे. मार्च, २०२२ सालापर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. एमएमआरडीएनुसार मार्गिकेच्या ७० टक्के युटिलिटी वर्क झाले असून, पाइलिंग वर्क ३७ टक्के, पाइल कॅप वर्क २१ टक्के करण्यात आले आहे. या मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी करण्यात येणाºया झाडांच्या तोडीविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली होती.
न्यायालयाने झाडे तोडण्यावर तात्पुरता प्रतिबंध करण्यात आले आहे. यामुळे एमएमआरडीएने ज्या ठिकाणी झाडे नसतील, अशा ठिकाणी वेगाने काम सुरू केले आहे. ठाणे येथील तीन हात नाका ते कासारवडावली दरम्यान बहुतांश पीलरही तयार करण्यात आले आहेत.
मेट्रो-२ बी, मेट्रो-४ आणि मेट्रो-६ हे प्रस्तावित मेट्रो मार्ग भुयारी करण्यात यावेत, या मागणीसाठी पवई तलाव येथे शांततेत आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी यावेळी असे सांगितले की, भूमिगत मेट्रो तयार केल्यावर फक्त झाडेच वाचणार नाहीत, तर यामुळे इतर फायदेही होतील. जर शहराच्या दुसºया भागांमध्ये भुयारी मेट्रो होऊ शकते, तर या तीन मेट्रो मार्गिका का नाही होऊ शकत, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच भूमिगत मेट्रो तयार केल्यावर रस्त्यावरील वाहतूककोंडीही टळेल, असेही यावेळी आंदोलकर्ते म्हणाले.